Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

योगेश पाटील राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

महसूल विभागातील उल्लेखनिय कार्याबद्दल गौरव

टिम नजरकैद by टिम नजरकैद
December 13, 2022
in जळगाव
0
योगेश पाटील राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव-(प्रतिनिधी) -“शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुउद्देशीय संस्था नाशिक” यांच्या वतीने योगेश पाटील अव्वल कारकून उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव यांना ‘शिवपुत्र महाराष्ट्र गौरव’ या राज्यस्तरीय पुरस्काराने नगर येथील माऊली सभागृहात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, साहित्यिक, कवी फ.मु. शिंदे यांच्या हस्ते नुकतेच सन्माणित करण्यात आले.

आईच्या न्यायालयात सर्व गुन्हे माफ असतात. आईने दिलेल्या संस्काराची, ज्ञानाची शिदोरी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडते. भारतीय संस्कृती महान आहे. तिचा वसा घेऊन आपण सर्वजण पुढे जात आहोत. आपापल्या क्षेत्रामध्ये सर्वांनी केलेल्या कामामुळे भारत लवकरच विश्वगुरु होईल, अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, साहित्यिक, कवी फ.मु. शिंदे यांनी कार्यक्रमाच्या वेळी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त नेत्रतज्ञ डॉ. सुधा कांकरीया होत्या. यावेळी संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, नागेबाबा उद्योग समुहाचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, पुरुषोत्तम गड्डम व संभाजी पाटील उपस्थित होते.

नाशिक येथील शिवपुत्र संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था या राष्ट्रीय उपक्रमशिल संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक तथा राजकिय व प्रशासकिय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार व शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

या कार्यक्रमात निलेश लंके पारनेर आमदार विधानसभा, माणिक आहेर उपविभागीय अधिकारी वैजापूर, योगेश पाटील अव्वल कारकून उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव, डॉ. पीयुष पाटील प्राईम केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल नगर, राहुल पवार उद्योजक तथा अध्यक्ष मराठा प्रिमियर लीग जळगाव, डॉ. मोसिम शेख मंडळ अधिकारी राहाता ता. नगर, साहेबराव मेंगडे संचालक अमृत फुड्सव हर्बल्स प्रा.लि., भानुदास मस्के सेवानिवृत्त नायब तहसीलदार संभाजीनगर यांचा राज्यस्तरीय शिवपुत्र पुरस्काराने व वीर पत्नी छाया उदार, रुपाली कदम, शीतल महाले लेखाधिकारी नियोजन विभाग औरंगाबाद यांचा राज्यस्तरीय शिवकन्या पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

अव्वल कारकून योगेश पाटील हे प्रारंभी महसूल सहाय्यक पदावर रुजू झाले. त्यांना महसूल सहाय्यक पदावर असताना दोन वेळा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरविण्यात आले. मंडळ अधिकारी बोदवड पदावर कार्यरत असताना सन 2013-14 मध्ये जिल्हास्तरावरील पुरस्कार व सन 2015-16 मध्ये महाराजस्व अभियानामधील उल्लेखनीय कामकाजामुळे ‘उत्कृष्ट मंडळ अधिकारी’म्हणून राज्यस्तरीय पुरस्कारासाठीसुद्धा शिफारस करण्यात आली. तसेच अव्वल कारकून पदावर कार्यरत असताना तत्कालीन महसूल मंत्री मा. चंद्रकांतजी पाटील यांच्या हस्ते आपणास सन 2016-17 चा ‘उत्कृष्ट अव्वल कारकून’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. जळगाव जिल्ह्याच्या 7/12 संगणकीकरणातील व जुन्या अभिलेख स्कॅनिंगच्या कामकाजाचा आलेख उंचावल्याने त्यांना सन 2017-18 मध्ये राज्यस्तरीय पुरस्कारासाठीही शिफारस करण्यात आली. कोरोना संक्रमणातील काळात अडकलेल्या नागरीकांना दिलासा देण्यासाठी ई-प्रवास पासची जबाबदारी यशस्वी पार पाडल्याने त्या कार्याची पावती म्हणून मा.ना.श्री. गुलाबरावजी पाटील, पालकमंत्री जळगाव यांनीही सन्मानित केले आहे.

याची दखल घेत नाशिक येथील शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने योगेश पाटील यांना शिवपुत्र महाराष्ट्र गौरव हा पुरस्कार देऊन सन्माणित करण्यात आले.

संस्थेच्या वतीने गेल्या वीस वर्षापासून राज्यस्तरीय शिवपुत्र व शिवकन्या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. छत्रपती संभाजीराजे यांच्या नावाने हा सन्मान दिला जातो. समाजामध्ये चांगले काम करणाऱ्यांची संस्थेने दखल घेतली आहे. समाजकार्यातुन राष्ट्रउभारणीचा पाया उभा राहतो. त्यासाठी चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी समाजाने उभे राहणे गरजेचे असल्याचे प्रास्ताविकात जगन्नाथ पाटील म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी ; राज्यात १० हजार ग्रामसेवक पदांची भरती, संपूर्ण वेळापत्रक पहा…

Next Post

सरपंच निवडणूक लढविण्यासाठी आता नवा नियम लागू ; तुम्हालाही माहिती असायलाचं हवं…

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
सरपंच निवडणूक लढविण्यासाठी आता नवा नियम लागू ; तुम्हालाही माहिती असायलाचं हवं…

सरपंच निवडणूक लढविण्यासाठी आता नवा नियम लागू ; तुम्हालाही माहिती असायलाचं हवं...

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us