जळगाव, (प्रतिनिधी)- दिल्ली राजस्थान,गुजरात व गोवा या राज्यातून महाराष्ट्रात विमान,रेल्वे व रस्त्यांनी प्रवास करणाऱ्या व्यक्तीवर निर्बंध लागू करण्यात आले असून प्रवास करून येणाऱ्या नागरिकांची त्या त्या स्थानकांवरच प्राथमिक तपासणी करण्यात येईल व कोव्हीड सदृश्य लक्षणे आढळल्यास जवळच्या कोव्हीड केयर सेंटर येथे पुढील चाचणी साठी यापुढे पाठवण्यात येणार आहे याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपवली असून चाचण्यांसाठी लागणार खर्च प्रवाशी नागरिकांकडून घेण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश आज दिनांक 25 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले.
आदेशात म्हटलं आहे की,महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्रालय मुंबई यांच्याकडे दिनांक 23 नोव्हेंबर 2020 मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार एनसीआर दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा या राज्यातून महाराष्ट्रात विमान रेल्वे व रस्त्यांनी प्रवास करणाऱ्या व्यक्तीवर निर्बंध लागू करण्यात आलेले आहे तसेच याबाबत या कार्यालयाचे आदेश दिनांक 24 नोव्हेंबर 2020 अनुभव मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा या राज्यातून जळगाव जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची covid-19 चाचणी करणे बाबत खालील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत असून सदर च्या सूचना दिनांक 25 नोव्हेंबर पासून अमलात येतील.
दिल्ली, राजस्थान,गुजरात व गोवा येथून प्रवास करून आल्यास अशा सर्व प्रवाशांना तात्काळ संबंधित रेल्वेस्थानकाजवळ च्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये पुढील चाचणी, तपासणी करता तपासणी पथकाने संदर्भित करावे. तसेच covid-19 सदृश्य लक्षणे दिसून येत असलेल्या व्यक्तींसोबत प्रवास करत असलेले नातेवाईक संबंधित व्यक्तीच्या गटातील सहप्रवासी यांनादेखील तत्काळ संबंधित रेल्वे स्थानकाच्या जवळच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.
















