Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावलहुन अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा पोलीसांनी लावला शोध ; आज केले मुलीला केले कुटुंबाच्या स्वाधीन पोलीसांचे सर्वत्र कौतुक

najarkaid by najarkaid
May 24, 2021
in जळगाव
0
यावलहुन अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा पोलीसांनी लावला शोध  ; आज केले मुलीला केले कुटुंबाच्या स्वाधीन पोलीसांचे सर्वत्र कौतुक
ADVERTISEMENT

Spread the love

यावलहुन अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा पोलीसांनी लावला शोध आज केले मुलीला केले कुटुंबाच्या स्वाधीन पोलीसांचे सर्वत्र कोत्तुक

यावल (दिपक नेवे)- येथील धोबीवाडा परिसरातील राहणारी १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी सुमारे दीड वर्षापुर्वी शाळेतुन बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली होती, दरम्यान मागील आठवड्यात तिचे अपहरण उतरप्रदेशच्या एका व्याक्तीने केल्याची नंतर फिर्याद त्या मुलगीचे आजोबा यांनी केल्यांनतर यावल पोलीसांनी गांर्भीयाने दखल घेत तपासाची चक्रे तात्काळ योग्य दिशेने फिरवुन अखेर त्या अल्पवयीन मुलीस शोध लावुन ताब्यात घेवुन आज तिच्या पालकांचे स्वाधीन केले आहे . या संदर्भात यावल पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी ट्विंकल किरण कोळी ही यावल येथे आपल्या आईचे वडील आजोबा भिमसिंग गंगाराम कोळी रा . धोबीवाडा यावल यांच्याकडे राहुन शिक्षण घेत असतांना दिनांक १९ / ११ / २०१९ रोजी सकाळी ११ , ३० वाजेच्या सुमारास तिला शाळेच्या परिसरातुन कुणीतरी अज्ञात व्यक्ति रिक्शात बसवुन घेवुन गेल्याची माहीती शाळेच्या सुत्रांकडुन प्राप्त झाली होती.

दरम्यान याबाबत टिंकल कोळी चे आजोबा भीमसिंग कोळी यांनी आपली नात व तिची आई मनीषा ही सुप्रीम कॉलनी मध्ये जळगाव येथे राहत असल्याने सर्वप्रथम त्यांनी आपल्या मुली कडे जाऊन नातू चा शोध घेतला मात्र त्याठिकाणी त्यांची नात व मुलगी या दोघ ही मिळून आल्या नाहीत नंतर त्यांनी आपल्या नातेवाईकांकडे देखील ट्विंकल आणि त्याची आई मनिषा त्या दोघांचा शोध घेतला मात्र तरीदेखील ते मिळून आले नाहीत अखेर भिमसिंग कोळी यांनी आपली नात ही बेपत्ता झाल्याची खबर यावेळी पोलिसात दाखल केली होती अखेर दीड वर्षानंतर दिनांक २४ एप्रिल रोजी सकाळी ४ वाजताच्या सुमारास अचानक ट्विंकलचा फोन आला आणि आपण देरवा चौक , बडहलगंज गोरखपूर जिल्हा उत्तर प्रदेश सरकारी दवाखान्याच्या मागे राहत असून असल्याची सविस्तर माहिती ट्विंकल कोळी हिने आपल्या आजोबांना दिली व सांगितले की आपण येथे आपले आई सोबत नवीनसिंग उर्फ गुड्डन रामा शंकरसिंग सोबत राहात असुन, ह्याच व्यक्तीने यावलहुन आपणास रिक्षात बसून उत्तर प्रदेश येथे आणले होते तेव्हापासून आपण आपल्या आई बरोबर कानपूर येथे राहात होते परंतु साधारण एक महीन्यांपुर्वी ट्विंकल कोळी हे ची आई मनीषा कोळी या महिलेचे कोरोनामुळे दवाखान्यात निधन झाले व त्यानंतर लागलीच सकाळी चार वाजता ट्विंकल कोळी हिने यावल येथे आपल्या आजोबांशी संपर्क साधून सविस्तर माहिती कळविली.

या ट्विंकल हिने दिलेल्या या माहितीचा आधार घेउन तात्काळ या वरचे पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले आणि सहायक फौजदार विजय पाचपोळे या दोन अधिकाऱ्यांचे पथक स्थापन करून अल्पवयीन मुली चे आजोबा भिमसिंग कोळी यांना सोबत घेऊन पथक हे उत्तर प्रदेश कडे रवाना झाले व त्यांनी बडहल गंज पोलिसांच्या सहकार्याने देरवा चौक या गावात जाऊन अखेर त्या मुलीची ओळख तिचे आजोबाने केल्यावर आजोबांचे आवाज ऐकुन ट्विंकल ही आजोबा धावत आली नंतर पोलीसांनी तिला ताब्यात घेतले व बडहलगंज पोलिस चौकी मध्ये आणले उत्तर प्रदेश पोलिसांनी कायद्याची पुर्तता करून अखेर हे पथक त्या अल्पवयीन मुलीला घेऊन काल रात्री बारा वाजेच्या सुमारास यावल येथे दाखल झाले यावल पोलिसांनी ट्विंकल कोळी यांच्या कुटुंबातील इतर मंडळीशी संपर्क साधून तिला आजोबासह कुटुंबाच्या स्वाधीन केले.

यावेळी ट्विंकल चे आजोबा यांनी यावल पोलिसांचे विशेष आभार मानले आपले नातू आपल्या ताब्यात मिळाली या आनंदाने त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले या सर्व तपासकार्यात यावल येथील भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष डॉ निलेश गडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली तसेच या शोधकार्यासाठी गेलेले पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले व सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आभार मानून विशेष कौतुक केले

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दक्षिण मध्य रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती ; 10 वी,12 वी पास करू शकता अर्ज

Next Post

यावल येथे दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील १२लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत धनादेश वितरीत

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
यावल येथे दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील १२लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत धनादेश वितरीत

यावल येथे दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील १२लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत धनादेश वितरीत

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us