मुंबई : राज्यात कालच्या तुलनेत आज कोरोना बाधितांच्या मृत्यूंच्या संख्येत मोठी घट झाली असून तर दैनंदिन रुग्णसंख्याही किंचित घटली आहे. राज्यात आज ४ हजार ३४२ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे असून ४ हजार ७५५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या बरोबरच राज्यातील एकूण अॅक्टिव्ह करोना बाधित रुग्णांची संख्या ५० हजार ६०७ इतकी झाली आहे. काल ही संख्या ५१ हजार ०७८ वर होती.
आज राज्यात झालेल्या ५५ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ८१ हजार ९८५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के इतके झाले आहे.
राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट अजुनही पूर्णपणे ओसरलेली नाही, अद्यापही रोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येत भर पडतच आहे. तर, दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येताना दिसत आहे. राज्य सरकारकडून निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत, मात्र जर नागरिकांनी नियम पाळले नाहीत व करोनाबाधितांची संख्येत वाढ सुरू झाली तर, पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याचा इशारा देखील दिला गेला आहे.
२,८७,३८५ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४३ लाख २७ हजार ४६९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ७३ हजार ६७४ (११.९२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८७ हजार ३८५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ९७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.