Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘मॉन्ट ब्लँक’ नावाच्या नकली वेबसाईटपासून सावधान!

najarkaid live by najarkaid live
May 21, 2020
in राज्य, क्राईम डायरी
0
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई दि.२१-  मॉन्ट ब्लँक (Mont Blanc) नावाच्या नकली वेबसाईटसंदर्भात आर्थिक  फसवणुकीच्या अनेक तक्रारी येत आहेत. या नकली वेबसाईटपासून सावध राहावे असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे.

 फेक वेबसाईट

सध्या लॉकडाऊनच्या काळात बरेच सायबर भामटे खोटे मेसेजेस व फेक वेबसाईट बनवून लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. Mont Blanc या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या नावाने सध्या बरेच मेसेजेस व पोस्ट व्हायरल होत आहेत. या कंपनीने आपल्या आंतरराष्ट्रीय उत्पादनांवर विशेषतः त्यांच्या शाई पेन या उत्पादनावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात लॉकडाऊनच्या काळात सूट दिली आहे व सर्वांनी त्यांच्या वेबसाईटवरून त्यांची उत्पादने  विकत घ्यावीत . महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की जर तुम्हाला अशा कोणत्या प्रकारचा मेसेज आला व खालील पैकी कोणत्याही वेबसाईटचे नाव त्या मेसजमध्ये दिसल्यास त्यावर क्लिक करू नये. कारण त्या वेबसाईट या सायबर भामट्यांनी लोकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्याकरिता बनविलेल्या फेक वेबसाईट आहेत.

फेक वेबसाईटची नावे

https://montblancindia.co
https://montblancsindia.com
https://montblancindias.com
https://montblancindia.org
https://montblancindia.co

Mont Blanc या आंतरराष्ट्रीय कंपनीचे अधिकृत विक्रेते हे टाटा क्लिक (Tata Cliq) आहेत व त्यांची वेबसाईट https://luxury.tatacliq.com/अशी आहे. त्यामुळे जर कोणत्याही नागरिकांनी वरीलपैकी कोणत्याही फेक वेबसाईटवर खरेदी केली असेल व त्यांना डुप्लिकेट वस्तू किंवा अजून खरेदी केलेल्या वस्तूंची डिलिव्हरी मिळाली नसेल तर त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार द्यावी व www.cybercrime.gov.in  या वेबसाईटवर देखील त्याची नोंद करावी. असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर विभाग यांच्या वतीने करण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या काळात राज्यात सायबर संदर्भात ४०४ गुन्हे दाखल झाले असून २१३ व्यक्तींना अटक केली आहे.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.

टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य समाजमाध्यमांवर  चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात

महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण ४०४ गुन्ह्यांची (ज्यापैकी २० N.C आहेत) नोंद २० मे २०२० पर्यंत झाली आहे.

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १७० गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १६१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी १८ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ७ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, यूट्यूब ) गैरवापर केल्याप्रकरणी ४४ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २१३ आरोपींना अटक केली आहे. यापैकी १०२ आक्षेपार्ह पोस्ट्स टेक डाऊन (takedown) करण्यात यश आले आहे .

बीड जिल्ह्यात नवीन गुन्हा

बीड जिल्ह्यातील दिंदुड पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ४१ वर गेली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर फिर्यादी हा कोरोनाग्रस्त रुग्ण आहे अशा आशयाची खोटी पोस्ट टाकून फिर्यादीस व त्याचा कुटुंबास बदनाम केले व समाजात आणि परिसरात फिर्यादीबाबत अफवा पसरविली .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी तीस कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

कोरोना लढाईत “पिंक आर्मी”मैदानात !

Related Posts

Janhit Suraksha Bill

Janhit Suraksha Bill : पुण्यात जनहित सुरक्षा विधेयकाविरोधात संविधान रक्षक समितीची महाबैठक

July 23, 2025
spy camera wife Video shoot : धक्कादायक! स्पाय कॅमेराने पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ शूट ; कारण ऐकून येईल तुम्हाला चीड!

spy camera wife Video shoot : धक्कादायक! स्पाय कॅमेराने पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ शूट ; कारण ऐकून येईल तुम्हाला चीड!

July 22, 2025
" Mahar Vatan Land Decision ; महार वतन जमिनीवरून मोठा निर्णय? काय सांगितलं मंत्री बावनकुळे यांनी?"

” Mahar Vatan Land Decision ; महार वतन जमिनीवरून मोठा निर्णय? काय सांगितलं मंत्री बावनकुळे यांनी?”

July 22, 2025
Mother Beats 4 Year Old Child – आईची चिमुकलीला बेदम मारहाण – व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

Mother Beats 4 Year Old Child – आईची चिमुकलीला बेदम मारहाण – व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

July 22, 2025
Breking news in jalgaon

murder news : पतीचा खून करून घरातच मृतदेह पुरला… टाईल्स लावून गुन्हा लपवला!

July 21, 2025
Building Workers Pension Scheme

Building Workers Pension Scheme ; कामगारांसाठी मोठी बातमी! पेन्शन योजना सुरु, असा करा अर्ज!

July 21, 2025
Next Post
कोरोना लढाईत “पिंक आर्मी”मैदानात !

कोरोना लढाईत "पिंक आर्मी"मैदानात !

ताज्या बातम्या

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय... पण खरं आहे!

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!

July 23, 2025
Wife Kill Husband : गुगलवर 'व्यक्तीला कसं मारायचं' शोधलं... आणि पत्नीने पतीचा केला खून!

Wife Kill Husband : गुगलवर ‘व्यक्तीला कसं मारायचं’ शोधलं… आणि पत्नीने पतीचा केला खून!

July 23, 2025
Gift received ₹5 crore income Tax : ₹5 कोटींचा चेक भेट म्हणून मिळाल्यास कर लागेल का? जाणून घ्या काय सांगतो आयकर कायदा!

Gift received ₹5 crore income Tax : ₹5 कोटींचा चेक भेट म्हणून मिळाल्यास कर लागेल का?

July 23, 2025
Janhit Suraksha Bill

Janhit Suraksha Bill : पुण्यात जनहित सुरक्षा विधेयकाविरोधात संविधान रक्षक समितीची महाबैठक

July 23, 2025
"Jalgaon heavy rain forecast - Panjabrao Dakh Havaman Andaj July 2025"

Panjabrao Dakh Havaman Andaj: जळगावसह राज्यात ‘या’ तारखेला जोरदार पावसाचा अंदाज

July 23, 2025
Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या

Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या

July 23, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us