Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबईत कुणबी जात प्रमाणपत्राच्या वितरणासाठी ‘या’ दिवशी शिबिर ; ठिकाणांची यादी व संपर्क क्रमांक वाचा

najarkaid live by najarkaid live
January 25, 2024
in राज्य
0
मुंबईत कुणबी जात प्रमाणपत्राच्या वितरणासाठी ‘या’ दिवशी शिबिर ; ठिकाणांची यादी व संपर्क क्रमांक वाचा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. २५ : मुंबई शहर जिल्ह्याच्या विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये आढळून आलेल्या कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी- मराठा प्रवर्गाच्या अभिलेख्यांची व्यक्तीनिहाय यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या यादीमध्ये समाविष्ट व्यक्ती तसेच आवश्यक पुरावे सादर करणारे अर्जदार नियमानुसार पात्र ठरत असल्यास, अशा व्यक्तींचे जात प्रमाणपत्र संदर्भातील अर्ज भरुन घेणे, ते स्वीकारण्यासाठी ३० व ३१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० या कालावधीत विशेष शिबिर होणार आहे, असे मुंबई शहरचे उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे (सा. प्र.) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

हे शिबिर जिल्हास्तरीय आपले सरकार सेवा केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार, ओल्ड कस्टम हाऊस, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई येथे तसेच नागरिकांच्या सोयीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील एकूण ९ वॉर्डमधील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये स्थापन करण्यात आलेल्या विशेष कक्षात होईल.

मा. न्यायमूर्ती शिंदे समिती (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने विविध जिल्ह्यांत आढळून आलेल्या कुणबी नोंदीसंदर्भात संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र तत्काळ निर्गमित करणे आवश्यक असल्याचे राज्य शासनाने १८ जानेवारी २०२४ रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे. त्यानुसार कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जातीसंदर्भात आढळून आलेल्या नोंदींच्या आधारे संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी या शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यातील कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी- मराठा या प्रवर्गातील नागरिकांनी आपल्याकडील उपलब्ध पुराव्यांसह शिबिरांच्या ठिकाणी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.

विशेष कक्ष स्थापन केलेल्या ठिकाणांची यादी व संपर्क क्रमांक असे (अनुक्रमे कार्यालयाचे नाव/बृहन्मुंबई वॉर्ड, पत्ता, आपले सरकार केंद्र चालकाचे नाव, मोबाईल क्रमांक या क्रमाने) : जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर, तळमजला, ओल्ड कस्टम हाऊस, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई, नीलेश बापूसाहेब माने- देशमुख, ९७६९२४१३१४. ‘ए’ वॉर्ड, १३४ ई, शहीद भगतसिंग मार्ग, रिझर्व्ह बँकेजवळ, फोर्ट, मुंबई, प्रभू हिरा राठोड, ९७६८०५७१८०. ‘बी’ वॉर्ड, १२१, रामचंद्र भट मार्ग, सर ज. जी. रुग्णालयासमोर, मुंबई, सुधीर रमाकांत चिंबूलकर, ९००४३५२१३४. ‘सी’ वॉर्ड, ७६, श्रीकांत पालेकर मार्ग, चंदनवाडी स्मशानभूमीजवळ, मुंबई, महेश नथुराम साळवी, ९८७०८७७५३३. ‘डी’ वॉर्ड, जोबनपुत्र कम्पाऊंड, नाना चौक, मुंबई, ऋग्वेद रवींद्र खांडेकर (९९६७०२१५२२), प्रथमेश प्रकाश राऊत (९८९२००२१७०). ‘ई’ वॉर्ड, १०, शेख हफिजुद्दीन मार्ग, भायखळा, मुंबई, यश एन्टरप्रायजेस (९७०२२८९७६४), परवेझ अहमद अन्सारी (९८२१३८७९१८). ‘एफ’ नॉर्थ, प्लॉट क्रमांक ९६, भाऊ दाजी रोड, किंग्ज सर्कल, माटुंगा पूर्व, मुंबई, रुपेश दत्तराम जाधव (९१६७९१८४४०), मनाली मधुकर जाधव (९३२०४७४८९३). ‘एफ’ साऊथ, जगन्नाथ भातनकर मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड जंक्शन, परळ नाका, मुंबई, सिद्धी प्रमाणे बामणे (९९८७३१५९५६), गणेश हनुमंत सूर्यवंशी (९३२३०३६२११). ‘जी’ नॉर्थ, हरिश्चंद्र येलवे मार्ग, प्लाझा सिनेमा मागे, मुंबई, प्रवीण साहेबराव निकाळजे (९८९२०५०६४५), अथर्व जितेंद्र तांडेल (९१३७३४५०९६). ‘जी’ साऊथ, धनमिल नाका, ना. म. जोशी, मार्ग, मुंबई, चैतन्य हेमंत दाभोळकर (८८९८८५२३७३), पूजा विनायक मयेकर (८०८२७६९३९३).

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगांव जिल्हा पोलीस दलातील ६४ पोलीस अंमलदारांची पदोन्नती

Next Post

अयोध्येत श्री राममंदिर-मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणं आयुष्यातील सर्वांग सुंदर अनुभूती होती – अशोक जैन

Related Posts

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

August 18, 2025
Next Post
अयोध्येत श्री राममंदिर-मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणं आयुष्यातील सर्वांग सुंदर अनुभूती होती – अशोक जैन

अयोध्येत श्री राममंदिर-मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणं आयुष्यातील सर्वांग सुंदर अनुभूती होती - अशोक जैन

ताज्या बातम्या

जळगाव महापालिका निवडणुकीत खळबळ; डिजिटल सहीवरून उमेदवारी अर्जांवर भाजपचा आक्षेप

December 31, 2025
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
बाबरुडमध्ये सुनिल कोळी यांचे अत्याधुनिक ऑनलाईन कृषी व आर्थिक सेवा केंद्र सुरू

बाबरुडमध्ये सुनिल कोळी यांचे अत्याधुनिक ऑनलाईन कृषी व आर्थिक सेवा केंद्र सुरू

December 27, 2025
एक मत, पण मोठा निर्णय! सौ. कविता आबा सोनवणे (कोळी) सरपंचपदी विराजमान

एक मत, पण मोठा निर्णय! सौ. कविता आबा सोनवणे (कोळी) सरपंचपदी विराजमान

December 27, 2025

अभियांत्रिकी पद्धतीने शेती करा – डॉ. इंद्रमणी मिश्रा

December 25, 2025
लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी – डॉ. एन. के. कृष्णकुमार

लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी – डॉ. एन. के. कृष्णकुमार

December 25, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us