




जळगांव – के.सी.ई.सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिम्मित मूळजी जेठा महाविद्यालयातील जनसंवाद व पत्रकारिता विभाग आणि शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १४ मार्च रोजी, “ मास मीडिया, शिक्षण आणि खेळ”,या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपण जगत आहोत.माहितीचा महापूर आलेला आहे, या पार्श्वभूमीवर ज्ञान कसे वापरावे, याचे सामाजिक भान असणे आवश्यक आहे, जगाच्याकुठल्याही भागात काहीही घडले तरी चुटकीसरशी ते आपल्या पर्यंत पोहचते.तसेच आपण आपल्याला सुदृढ ठेवण्यासाठी खेळ खेळावा लागतो- व्यायाम करावा लागतो.मास मीडिया, शिक्षणशास्त्र आणि शारिरीक शिक्षणशास्त्र यांचा परस्पर संबंध शोधणारी व दिशा दर्शक एकदिवसीय राष्ट्रीय परिषद याच उद्देशातून घेण्याचे ठरविले आहे.या राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन प्रसंगी आणि मार्गदर्शक म्हणून खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अनिल पाटील, संपादक (दै. देशदूत), विशाल चढ्ढा, संपादक (दै. तरुण भारत), विशाल पाटील,आउटपुट एडिटर (लोकशाही न्युज चॅनेल-मुंबई) , अपर्णा देसाई- (ऑल इंडिया रेडिओ अहमदाबाद),डॉ. राहुल रणाळकर संपादक (दै. सकाळ) दिनेश पाटील- डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स, (क.ब.चौ.नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी) डॉ. गजानन गुल्हाने–हेड डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन (एस.जी.बी.ए.यु, अमरावती)डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर-डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स (के.सी.ई.एस, एम.जे.कॉलेज) निलेश झाल्टे- ABP माझा मुंबई ,डॉ. किशोर पी.पाठक- बी.ओ.एस. (मेंबर,क.ब.चौ. नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी )डॉ.साहेबराव टी.भूकन,बी.ओ.एस. मेंबर (क.ब.चौ. नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ) प्रसिद्ध न्युज अँकर ज्ञानदा कदम- ABP माझा, मुंबई, मिलिंद कुळकर्णी, संपादक (दै.लोकमत, जळगांव) आणि सुधीर ओखदे, प्रोग्राम ऑफिसर( ऑल इंडिया रेडिओ, जळगांव)
या राष्ट्रीय परिषदेत सहभागी होणाऱ्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी आपले संशोधन निबंध दि.७ मार्च सायंकाळी ५ वाजेपर्यंत mmesjal2020@gmail.com वर पाठवावेत.अधिक माहितीसाठीसाठी आयोजन समन्वयक प्रा.संदीप केदार (विभागप्रमुख,जनसंवाद व पत्रकारिता विभाग ),प्रा.निलेश जोशी,प्रा.केतन चौधरी यांच्याशी संपर्क करावा.तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी याराष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदवावा असे आवाहन प्राचार्य सं.ना.भारंबे व प्राचार्य ए.आर.राणे यांनी केले आहे.









