Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव, नाहीतर ..वारंवारच्या धमकीने १७ वर्षीय मुलीची आत्महत्या, ११ दिवसानंतर तरुणावर गुन्हा

Editorial Team by Editorial Team
April 9, 2023
in जळगाव
0
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव, नाहीतर ..वारंवारच्या धमकीने १७ वर्षीय मुलीची आत्महत्या, ११ दिवसानंतर तरुणावर गुन्हा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव:  पहूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. दरम्यान, मुलीचे  तरुणासोबत प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधाबाबची माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर त्यांनी मुलीची समजूत घातली, त्यानंतर मुलगी आणि तरुणामधील प्रेमसंबंध तुटले. मात्र, तेव्हा तरुणाने अल्पवयीन मुलीला फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.वारंवारच्या या धमकीमुळे या मुलीने आत्महत्या केल्याची बाब समोर आली असून याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अकरा दिवसानंतर मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी २३ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, पहूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह वास्तव्यास होती. काही दिवसांपूर्वी मुलीची २३ वर्षीय तरुणासोबत ओळखी झाली. या ओळखीतून दोघांमध्ये प्रेमाचे सूत जुळले. एकेदिवशी मुलगी तरुणासोबत फोनवर बोलत असताना नातेवाईकांना हा प्रकार लक्षात आला. नातेवाईकांनी मुलीला विश्वासात घेवून नेमका प्रकार काय आहे, याबाबत विचारले असता, मुलीचे तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. मुलगी ही अल्पवयीन असल्याने तसेच गावात बदनामी होईल म्हणून नातेवाईकांनी मुलीची समजूत घातली, त्यानंतर मुलगी आणि तरुणामधील प्रेमसंबंध तुटले.

 हे पण वाचा..

प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-अमरावती विशेष गाडी धावणार, ‘या’ स्टेशनवर थांबणार?

ISRO : भारतीय स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन 10वी, ITI उत्तीर्णांना नोकरी मिळविण्याची संधी..

शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड! काही मिनिटांत केली गव्हाची कापणी, Video होतोय तुफान व्हायरल

नातेवाईक तसेच कुटुंबियांना प्रकार माहिती पडल्यानंतर मुलीने तरुणास प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. मात्र, यानंतर तरुण हा प्रेमसंबंध ठेवण्यासाठी मुलीला आग्रह करत होता. प्रेमसंबंध तोडले तर माझ्यासोबतचे तुझे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करेन, अशी धमकीही संशयित तरुण मुलीला वारंवार देत होता. तरुणाकडून धमकी देत वारंवारचा त्रास आणि बदनामीच्या भितीने २९ मार्च रोजी मुलीने गळफास घेवून आत्महत्या केली होती.

याप्रकरणी सुरुवातीला पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीअंती, अकरा दिवसानंतर शुक्रवारी सायंकाळी याप्रकरणी तरुणाविरोधात पहूर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-अमरावती विशेष गाडी धावणार, ‘या’ स्टेशनवर थांबणार?

Next Post

सर्वसामान्यांसाठी खुशखबर..! खाद्यतेलाचे दर घसरले, आता एका किलोचा दर किती?

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
खुशखबर ! खाद्यतेल स्वस्त होणार, मोदी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

सर्वसामान्यांसाठी खुशखबर..! खाद्यतेलाचे दर घसरले, आता एका किलोचा दर किती?

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us