Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माझं राज्यसभेचं तिकीट निश्चित- रामदास आठवले

najarkaid by najarkaid
February 28, 2020
in राज्य, राजकारण
0
माझं राज्यसभेचं तिकीट निश्चित- रामदास आठवले
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – भारतीय जनता पक्षानं राज्यसभेसाठी माझी उमेदवारी निश्चित केली आहे,’ अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले  यांनी आज दिली. त्यामुळं राज्यसभेसाठी आता भाजपचा दुसरा उमेदवार कोण?; संजय काकडे की उदयनराजे भोसले यावरून तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. 

महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. त्या जागी वर्णी लागावी म्हणून भाजपमध्ये यावेळी जोरदार चुरस आहे. महाराष्ट्रातून साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले व विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी आठवले यांनी आज विधान भवनात येऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व अन्य नेत्यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना, त्यांनी राज्यसभेसाठी भाजपकडून आपली उमेदवारी नक्की असल्याचं सांगितलं. ‘मी केंद्रात राज्यमंत्री असल्यानं माझी उमेदवारी निश्चित आहे, असं भाजपच्या नेत्यांनी मला सांगितलंय. भाजपकडून माझ्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर मी अर्ज भरेन,’ असं त्यांनी सांगितलं.

आठवले यांची उमेदवारी निश्चित झाली असेल तर दुसऱ्या जागेवर भाजप  कोणाला संधी देणार या चर्चेला ऊत आला आहे. दुसऱ्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले व लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, या जागेसाठी राज्यसभेतील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी दंड थोपटले आहेत. ‘भाजपनं मला मेरिटवर संधी द्यायला हवी. उदयनराजेंचं भाजपमध्ये फारसं योगदान नाही,’ असं त्यांनी याआधीच म्हटलं आहे. त्यामुळं भाजप नेमका काय निर्णय घेणार याबद्दल उत्सुकता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुस्लिमांना आरक्षण देणार, लवकरच कायदा करणार: नवाब मलिक

Next Post

के सी ई चे आय एम आर मध्ये आय टी फेस्टा च्या स्पर्धांना सुरवात..

Related Posts

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
Next Post
के सी ई चे आय एम आर मध्ये आय टी फेस्टा च्या स्पर्धांना सुरवात..

के सी ई चे आय एम आर मध्ये आय टी फेस्टा च्या स्पर्धांना सुरवात..

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us