जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी माझ्याकडे कुठलाही राजीनामा दिलेला नाही…आणि देणारही नाही…नाथाभाऊ पक्षाचं नुकसान होईल असं काहीही करणार नाही असं स्पष्ट पणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘नजरकैद’ शी बोलतांना स्पष्ट केल आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पक्षाच्या सदस्त्वाचा अधिकृत पणे राजीनामा दिल्याचं वृत्त येत असल्याने याबाबत अधिकृत पणे जाणून घेण्यासाठी ‘नजरकैद’ ने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांदादा पाटील यांच्याशी दूरध्वनी वरून बातचीत केली असता नाथाभाऊंच्या राजीनाम्याबाबत थेट नकार दिला आहे.
नाथाभाऊ राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा असून विजयादशमी किंवा त्याआधी खडसे सीमोल्लंघन करत भाजपला मोठा धक्का देतील अशी जोरदार चर्चा आहे.नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आता विजयादशमीच्या अगोदर सीमाउल्लंघन करतील अशी चर्चा आहे.