Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटीलयांचे ८2 वर्षात पदार्पण

najarkaid live by najarkaid live
September 4, 2023
in राज्य
0
माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटीलयांचे ८2 वर्षात पदार्पण
ADVERTISEMENT
Spread the love

माजी केंद्रीय मंत्री आणि शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष श्री. विजय नवल पाटील यांचा पाच सप्टेंबर रोजी वाढदिवस. राजकीय क्षेत्रात त्यांनी अविरतपणे उल्लेखनीय कार्य केले. लोकप्रतिनिधी म्हणून समाजकारण करताना नानासाहेब यांनी शैक्षणिक, कृषी, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. नानासाहेब आज वयाच्या ८१व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने…………………..

शिक्षण क्षेत्रातील ‘विठोबा’ आदरणीय नानासाहेब
शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचा जन्म ५ सप्टेंबर १९४२ रोजी धुळे जिल्ह्यातील नवरी या गावी झाला. ८१व्या वर्षात पदार्पण करताना नानासाहेब आजही युवा पिढीला लाजवेल अशा उत्साहाने व ऊर्जेने काम करत आहेत. एक ऊर्जा निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणून नानासाहेब यांच्याकडे पाहिले जाते. आताच्या पिढीला म्हणजे सध्याच्या तरुणाईला लाजवेल अशा पद्धतीचे त्यांचं काम अविरणपणे सुरू आहे. नानासाहेब यांनी धुळे लोकसभा मतदार संघाचे सहाव्या लोकसभेत धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर एरंडोल या लोकसभा मतदार संघातून नानासाहेब हे सातव्या, आठव्या आणि दहाव्या लोकसभेसाठी निवडूण आले होते. केंद्रात नानासाहेब यांच्याकडे केंद्रीय (उप) विज्ञान आणि तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक स्पेस मंत्रीपद सोपवण्यात आले होते. त्यानंतर दळणवळण खात्याच्या मंत्री पदाची जबाबदारी नानासाहेबांनी यशस्वीपणे सांभाळली. नानासाहेब हे १९८५-८६मध्ये बिहार आणि ओरिसाचे प्रभारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव होते. महाराष्ट्रात राष्ट्रीय एकात्मता समिती (कॅबिनेट श्रेणी) २००२ ते २००५ या कालावधीत अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांंमध्ये नानासाहेब यांचे कार्य हे उल्लेखनीय आहे. पर्यावरण हा त्यांचा आवडता विषय. पर्यावरण संरक्षणासाठी त्यांनी कायम मार्गदर्शन केले, पुढाकार घेतला. वाढदिवसानिमित्त त्यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी हे वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करणार आहेत. आणि खऱ्या अर्थाने त्यांना वाढदिवसाच्या त्या शुभेच्छा असणार आहेत.
नानासाहेबांचे राजकीय कार्य हे अतिशय मोलाचं असं होतं. वयाच्या ३२व्या वर्षी त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केलं. सर्वात तरुण मंत्री होण्याचा बहुमान हा नानासाहेबांना मिळालेला आहे. तत्कालीन पंतप्रधानांच्या कार्यकाळात पंतप्रधानांच्या जवळचे जे निवडक लोक होते त्यांच्यामध्ये नानासाहेबांना एक आदराचं स्थान होतं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नानासाहेब हे अतिशय विश्वासू होते. कारण त्या काळाच ज्या काही राजकीय घडामोडी घडत, राजकीय हालचाली होत अशा वेगवेगळ्या परिस्थितीत नानासाहेब यांनी आपल्या कार्यातून इंदिरा गांधी यांचे मन जिंकण्याचे काम केलं होतं. नानासाहेबांचे वडील स्वातंत्र्य सैनिक नवल भाऊ हे खानदेशचे पहिले आमदार होते.

स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये नवल भाऊंनी केलेले कार्य अतिशय मोलाचे ठरले. खानदेशचे पहिले आमदार म्हणून नवल भाऊंनी अतिशय चांगले काम केले. आमदार म्हणून दोन वेळेस त्यांनी खानदेशचे प्रतिनिधित्व केले. नानासाहेबांना राजकारण व समाजकारणाचा संपन्न वारसा आपल्या वडिलांकडून मिळाला. हा वारसा व परंपरा जोपासण्याबरोबरच वाढवण्याचे काम नानासाहेबांनी अविरतपणे काम करून केले. नानासाहेब यांनी खासदार म्हणून त्यानंतर केंद्रात मंत्रीपद मिळाले आणि केंद्रीय मंत्री म्हणून नानासाहेबांनी अनेक चांगली कामे केली. ग्रामपंचायत पासून दिल्लीपर्यंत नानासाहेबांनी आपल्या कार्यशैलीने एक वेगळा नावलौकिक संपादन केला. नानासाहेबांचे राजकीय क्षेत्रातील राजकीय योगदान हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. परंतु, शैक्षणिक क्षेत्रातही नानासाहेबांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. शैक्षणिक पंढरीचा विठोबा म्हणून नानासाहेब यांना संबोधले जाते. त्याचं मुख्य कारण म्हणजे की, एक शैक्षणिक पंढरी निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेले आहे. अमळनेरला नानासाहेबांनी बीएड कॉलेज सुरू केलं. उसाच्या क्षेत्रात असलेल्या जागेवर नानासाहेबांनी वेळ महाविद्यालयाची स्थापना केली आणि या वेळ महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षक घडवण्याचे काम सुरू केले. या महाविद्यालयातून हजारो शिक्षक घडले आहेत. या महाविद्यालयातून घडलेले शिक्षक आज राज्यातील विविध ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

शिक्षण क्षेत्रात कार्य करताना त्यांनी ओसाड अशा परिसरात आयटीआयची स्थापना केली. त्यानंतर नानासाहेबांनी सैनिकी शाळा सुरू केली. नियमित अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण मिळावं या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रात सद्यस्थितीत ३६ सैनिकी शाळा आहेत आणि या ३६ सैनिकी शाळांमध्ये नानासाहेबांनी दोन सैनिकी शाळांची स्थापना केली आहे. त्यापैकी एक सैनिकी शाळा ही जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी आहे. दुसरी सैनिकी शाळा ही पनवेल या ठिकाणी आहे. या सैनिकी शाळेतून अनेक गुणवान विद्यार्थ्यांची पिढी घडली आहे आणि घडत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची व्याप्ती वाढवताना नानासाहेब यांनी कृषी महाविद्यालय, कृषी विद्यालयाची स्थापना केली. त्यानंतर डीटीएडची देखील स्थापना केली. अमळनेर शहरात नानासाहेब यांनी रुक्मिणीताई कला व वाणिज्य महाविद्यालय, सावित्रीबाई फुले कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजीव गांधी प्राथमिक विद्यामंदिर अशा शैक्षणिक संस्था निर्माण केल्या. एका शैक्षणिक संकुलात विविध पद्धतीचे शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळण्याची एक चांगली सुविधा उपलब्ध झाली. तसेच थापोरे, सडावण, पिंपळा, डांगर, नवलनगर, चिंचखेडा, पिंपळकोठा,ताडी अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या. औरंगाबाद शहरात संत मीरा माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली. या ठिकाणी साधारणत: नर्सरीपासून ते लॉ कॉलेज पर्यंतचे शिक्षण मिळण्याची सुविधा नानासाहेब यांनी निर्माण केली. नानासाहेब यांनी स्थापन केलेल्या विविध शैक्षणिक संस्थांमधून हजारो विद्यार्थी घडले आहेत आणि आजही घडत आहेत. त्यामुळेच नानासाहेबांना शैक्षणिक पंढरीचा विठोबा असे संबोधले जाते. हे संबोधन नानासाहेब यांना अतिशय चांगल्या पद्धतीने लागू होते.नानासाहेब यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. त्यात महत्त्वाचे म्हणजे त्या काळात राज्य शिक्षण संस्था महामंडळावर त्या काळातील मातब्बर राजकारणी कार्यरत होते. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती भैरव सिंग शेखावत यांच्याकडून राज्य शिक्षण संस्था महामंडळाची जबाबदारी नानासाहेब यांनी स्वीकारली. माझ्यानंतर महामंडळाचे कार्य पुढे नेण्याचे काम सक्षमपणे नानासाहेब हेच करू शकतात याच भूमिकेतून त्यांनी ही जबाबदारी नानासाहेब यांच्याकडे सोपवली. नानासाहेब यांनी हा विश्वास सार्थ ठरवला.

नानासाहेब यांनी तब्बल ११-१२ वर्षे महामंडळाचे काम अतिशय चांगल्या प्रकारे केले. काही महिन्यांपूर्वीच महामंडळाची ही जबाबदारी माजी कृषी मंत्री शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. परंतु, त्यांना सहकार्य करण्याचे काम नानासाहेब कार्याध्यक्ष म्हणून करत आहेत. महामंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या खासगी शिक्षण संस्था आहेत त्यांना न्याय देण्याचे काम नानासाहेबांनी केलेला आहे. अनेक वेळा स्वत:च्या पक्षाच्या विरोधात जाऊन सुद्धा त्यांनी भूमिका घेतलेल्या आहेत. फक्त आणि फक्त शिक्षण संस्था कशा पद्धतीने जीवंत राहतील, कशा पद्धतीने विकसित होतील हे एकमेव धोरण नानासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये ठेवलेले आहे आणि नानासाहेब हे कार्य अविरतपणे करत आहेत .श्री छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समितीत देखील नानासाहेबांनी सक्रिय भूमिका बजावलेली आहे. आज या कमिटीचे रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. त्यात नानासाहेबांची भूमिका मोलाची ठरलेली आहे. अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या कमिटीच्या माध्यमातून नानासाहेब हे करत आहेत. ज्यात अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. आजही नानासाहेब हे कार्य अविरतणपे करत आहेत. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र देखील या कमिटीच्या माध्यमातून निर्माण केलेली आहेत. अनेक विद्यार्थी या केंद्रातून स्पर्धा परीक्षेचे धडे घेत आहेत. भविष्यामध्ये मोठे अधिकारी सुद्धा होतील. यापूर्वी जे अनेक विद्यार्थी या केंद्रातून पुढे आले आहेत ते आता मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. नानासाहेबांचे शैक्षिणक क्षेत्रातील कामकाज हे मैलाचा दगड ठरणारे आहे. अशा शिक्षणाचा सामाजिक कार्याचा वारसा लाभलेला पंढरी व्यक्तिमत्वाला आई तुळजाभवानी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
– घमन आर.पाटील

ऑफिस सुप्रिडेंट

व्ही एन पाटील विधी महाविद्यालय,छत्रपती संभाजी नगर 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

व्यापाऱ्यांसाठी राज्यकर विभागाची अभय योजना ; अर्ज प्रक्रिया जाणून घ्या…

Next Post

सरकारी नोकरी शोधत आहे का? या ठिकाणी ८०० जागासाठी भरती, संपूर्ण अर्ज प्रक्रिया पहा

Related Posts

UPI New Rules | GPay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांनो १ ऑगस्ट पासून 'हे' नियम बदलणार, काय असतील मर्यादा!

UPI New Rules | GPay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांनो १ ऑगस्ट पासून ‘हे’ नियम बदलणार, काय असतील मर्यादा!

July 27, 2025
Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

July 27, 2025
Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

July 27, 2025
Mumbai Pune Expressway Accident

Mumbai Pune Expressway Accident : कंटेनरची २० वाहनांना धडक ; ४ ठार, आरडाओरड, गोंधळ आणि रक्ताने माखलेली दृश्ये

July 26, 2025
Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

July 26, 2025
RTI माहिती अधिकाराचा अर्ज कसा करावा?

RTI Guide in marathi: माहितीचा अधिकार अर्ज कसा करावा – संपूर्ण मार्गदर्शक RTI 2025

July 26, 2025
Next Post
सरकारी नोकरी शोधत आहे का? या ठिकाणी ८०० जागासाठी भरती, संपूर्ण अर्ज प्रक्रिया पहा

सरकारी नोकरी शोधत आहे का? या ठिकाणी ८०० जागासाठी भरती, संपूर्ण अर्ज प्रक्रिया पहा

ताज्या बातम्या

UPI New Rules | GPay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांनो १ ऑगस्ट पासून 'हे' नियम बदलणार, काय असतील मर्यादा!

UPI New Rules | GPay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांनो १ ऑगस्ट पासून ‘हे’ नियम बदलणार, काय असतील मर्यादा!

July 27, 2025
Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

July 27, 2025
Best banks for loans : कर्ज घेण्यासाठी सर्वोत्तम बँका कोणत्या?

Best banks for loans : कर्ज घेण्यासाठी सर्वोत्तम बँका कोणत्या?

July 27, 2025
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!

Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!

July 27, 2025
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी - सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

July 27, 2025
Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

July 27, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us