- जळगावात कर्मचाऱ्यांचे लक्षवेधी आंदोलनास शेकडो कर्मचाऱ्यांची उपस्थिती
- जळगाव – नोकरीतील पदोन्नतीच्या आरक्षणाची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने तात्काळ करावी या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दि. 15 ऑगस्ट रोजी आरक्षण बचाव कृती समिती जळगाव जिल्हा यांच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
याबाबत सविस्तर असे की, मागासवर्गीयांचे नोकरीतील पदोन्नती मधील बंद करण्यात आलेले आरक्षण मे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने पूर्ववत करावे या मागणीसाठी आज जळगाव येथील स्टेशन रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून लक्षवेधी आंदोलनाला सुरवात केली.विविध घोषणा देत मागासवर्गीयांना न्याय द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.या आंदोलनाला जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.या प्रसंगी हरिश्चन्द्र सोनवणे, आर.एस.डोळे, एस.के. लोखंडे यांनी आंदोलन कर्त्यांना मार्गदर्शन केले.न्याय मिळेपर्यंत आपण लढत राहू असे यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना सांगितले. यावेळी आर.डी.तायडे, योगेश नन्नवरे, अशोक बाविस्कर, प्रदीप शेकोकार, भीमराव तायडे, रोहिदास सोनवणे, जयंत सोनवणे, सुभाष पवार, राजू सोनवणे, राहुल नन्नवरे, एस.डी.कांबळे, डी.डी.चंदनकर, एम.एच.तडवी, पी.आर.निंबोळकर, डी.पी.सपकाळे, सी.बी.देवराज, किरण बाविस्कर आनंद खैरनार, प्रा.सी.पी.लाभणे अविनाश इंगळे यांच्यासह शेकडो मागासवर्गीय कर्मचारी उपस्थित होते.