धानोरा शाखेचा प्रताप,शेतकरी हैराण।
धानोरा ता.चोपडा :येथील सेंट्रल बॅकेकडून पात्र असतांनाही अनेक शेतकरींना पिककर्जासाठी अतिकाम असल्याचे सांगत फिरवा फिरव केली जात असल्याने कर्जाअभावी शेतकरी हैराण झाले असुन शेतकरींना वेठीस धरणऱ्या बॅक अधिकारींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
याबात अधिक माहिती अशी की धानोरा सेंट्रल बॅकेअंतर्गत परिसरातील पंधरा गावे पिककर्जासाठी दत्तक दिली आहेत.व या वर्षी मोठ्या प्रमाणावर दुष्काळी परिस्थीती असल्याने शेतकरींची आर्थिक घडी पुरती कोलमडली आहे.त्यातच शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला मात्र त्यातही अंशतः आणि तत्वतःच्या अटींमुळे शेतकरी मेटाकुटीस आले.व शेवटी दिड लाखाच्या माफीनंतर अनेक शेतीरींनी पुढे कर्ज उपलब्ध होईल या आशेने व्याज व दिड लाखावरिल रक्कम भरून उतारा निल केला मात्र आता नविन पिक कर्जासाठी बिडगांव येथील गोरख यादव पाटील,तुकाराम दलपत कोळी,दत्तात्रय गोरख पाटील,रणदास भटु बारेला, रामकृष्ण गोरख पाटील,योगीता रामकृष्ण पाटील,कमलबाई गोरख पाटील,आदि शेतकरी धानोरा सेंट्रल बॅकेत गेल्या एक ते दिड महिन्यापासुन वारंवार कर्ज प्रकरणासाठी कागदपत्रे घेऊन बॅकेत हेलपाटा घालत आहेत.त्यांना वारंवार आता जास्त लोड आहे तुम्ही पंधरा दिवसांनी या असे सांगीतले जाते त्यामुळे हक्काची शेती व शासनाचे धोरण असुनही निव्वळ येथील भोंगळ कारभारामुळे शेतकरींना ऐन हंगामाच्या दिवसात आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे शेतकरींना पिक कर्जापासुन वंचित ठेवणाऱ्या बॅक अधिकारींवर कारवाई करा अशी मागणी होत आहे.
चोपड्याऐवजी जळगावला मार्गेज
धानोरा बॅके अंतर्गत शेतकरींना पिककर्जासाठी मार्गेज करण्यासाठी अधिकृत मान्यताप्राप्त वकीलाकडून दस्ताएवज करावे लागतात आधी ते काम चोपडा येथे होत होते.मात्र आता अचानक
येथील बॅकेने हेच काम जळगाव येथील वकीलाकडून करणे बंधनकारक केल्याने शेतकरींना अनेक अडचणींना सामोरा जावे लागत असल्याने मार्गजचे काम चोपड्यातच व्हावे अशी मागणी होत आहे.
कामाचा अधिक भारामुळे वेळ लागतोय
पिककर्जाचे अनेक प्रस्ताव असल्याने कामाचा भार खुप वाढला आहे.त्यातच कर्मचारींची कमतरता आहे.त्यामुळे काही कामे करतांना उशीर होत असुन येत्या काही दिवसात मागणी करणाऱ्या शेतकरींना पिककर्ज देण्यात येईल.
सौरभ साकेत
शाखा व्यवस्थापक
सेंट्रल बॅक धानोरा.