Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांची संख्या झाली एक लाखावर !

najarkaid live by najarkaid live
April 24, 2020
in आरोग्य, राज्य
0
जिल्ह्यात आणखी पाच रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह
ADVERTISEMENT
Spread the love

  1. महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांची संख्या झाली एक लाखावर
    ५० वर्षांखालील व्यक्तींचा मृत्यूदर कमी
    राज्यात आज ३९४ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण संख्या ६८१७
    राज्यात कोरोना बाधित ९५७ रुग्ण बरे होऊन घरी
    -आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती 

मुंबई, दि. २४ : आज राज्यात कोरोनाबाधीत ३९४ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६८१७ झाली आहे. आज ११७ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ९५७ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५५५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २ हजार १८९ नमुन्यांपैकी ९४ हजार ४८५ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६८१७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख १९ हजार १६१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८,८१४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात १८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३०१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील ११, पुणे येथे ५ तर मालेगाव येथे २ मृत्यू झाले आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी १२ पुरुष तर ६ महिला आहेत. आज झालेल्या १८ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ९ रुग्ण आहेत तर ६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ३ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १८ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये ( ६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
सध्या राज्यातील कोरोना आजाराचा मृत्यूदर हा ४.४ टक्के आहे. राज्यातील २६९ मृत्यूंचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता ५० वर्षांखालील व्यक्तींचा मृत्यूदर हा कमी आढळून येतो, विशेषतः २१ ते ३० वर्षे वयोगटात मृत्यूदर ०.६४ टक्के इतका आहे तर त्यापुढील वयोगटात मृत्यूदर वाढताना दिसून येतो. ६१ ते ७० या वयोगटात मृत्यूदर सर्वाधिक म्हणजे १७.७८ टक्के एवढा आहे . यामुळे ५० वर्षांवरील आणि इतर अतिजोखमीचे आजार असणा-या व्यक्तीमध्ये कोरोना आजारामुळे गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असल्याचे अधोरेखित झाले आहे.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: ४४४७ (१७८)
ठाणे: ३५ (२)
ठाणे मनपा: २२० (४)
नवी मुंबई मनपा: १२५ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: १३१ (३)
उल्हासनगर मनपा: २
भिवंडी निजामपूर मनपा: १२
मीरा भाईंदर मनपा: ११८ (२)
पालघर: २१ (१)
वसई विरार मनपा: ११४ (३)
रायगड: १४
पनवेल मनपा: ४० (१)
ठाणे मंडळ एकूण: ५२७९ (१९८)
नाशिक: ४
नाशिक मनपा: ७
मालेगाव मनपा: ११६ (११)
अहमदनगर: २५ (२)
अहमदनगर मनपा: ८
धुळे: ६ (१)
धुळे मनपा: १६ (१)
जळगाव: ६ (१)
जळगाव मनपा: २ (१)
नंदूरबार: ७ (१)
नाशिक मंडळ एकूण: १९७ (१८)
पुणे: ४३ (२)
पुणे मनपा: ८४८ (६३)
पिंपरी चिंचवड मनपा: ७० (२)
सोलापूर: १
सोलापूर मनपा: ३८ (३)
सातारा: २० (२)
पुणे मंडळ एकूण: १०२० (७२)
कोल्हापूर: ७
कोल्हापूर मनपा: ३
सांगली: २५
सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
सिंधुदुर्ग: १
रत्नागिरी: ८ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ४५ (२)
औरंगाबाद:०
औरंगाबाद मनपा: ४२ (५)
जालना: २
हिंगोली: ७
परभणी: ०
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ५२(५)
लातूर: ९
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: १
लातूर मंडळ एकूण: १४
अकोला: ११ (१)
अकोला मनपा: १२
अमरावती: ०
अमरावती मनपा: १३ (१)
यवतमाळ: २३
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: ८१ (३)
नागपूर: २
नागपूर मनपा: ९९ (१)
वर्धा: ०
भंडारा: ०
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: २
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: १०४ (१)
इतर राज्ये: २५ (२)
एकूण: ६८१७ (३०१)

( टीप – या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा / मनपांनी उपलब्ध करुन दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात संसर्गग्रस्त झालेले आहेत. (बुलढाणा आणि जालना येथील एकूण ४ रुग्णांची झालेली दुहेरी नोंद आज दुरुस्त करण्यात आलेली आहे.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ५१२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ७७०२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २८.८८ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चिनावल ग्रामसेवकांवर कोरोना संचारबंदी आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई !

Next Post

मका उत्पादक शेतकऱ्यांना संजीवनी देणारा मुरघास उद्योगाचा खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

Related Posts

Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

July 27, 2025
Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

July 27, 2025
Mumbai Pune Expressway Accident

Mumbai Pune Expressway Accident : कंटेनरची २० वाहनांना धडक ; ४ ठार, आरडाओरड, गोंधळ आणि रक्ताने माखलेली दृश्ये

July 26, 2025
Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

July 26, 2025
RTI माहिती अधिकाराचा अर्ज कसा करावा?

RTI Guide in marathi: माहितीचा अधिकार अर्ज कसा करावा – संपूर्ण मार्गदर्शक RTI 2025

July 26, 2025
Nuga best

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

July 25, 2025
Next Post
मका उत्पादक शेतकऱ्यांना संजीवनी देणारा मुरघास उद्योगाचा खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

मका उत्पादक शेतकऱ्यांना संजीवनी देणारा मुरघास उद्योगाचा खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

ताज्या बातम्या

Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

July 27, 2025
Best banks for loans : कर्ज घेण्यासाठी सर्वोत्तम बँका कोणत्या?

Best banks for loans : कर्ज घेण्यासाठी सर्वोत्तम बँका कोणत्या?

July 27, 2025
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!

Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!

July 27, 2025
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी - सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

July 27, 2025
Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

July 27, 2025
Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

July 27, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us