मुंबई : काश्मिरी पंडितांच्या हत्येवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. काश्मिरी पंडितांच्या हत्या होत असून काश्मीर खोऱ्यातील हिंदू भयभीत झाला आहे. महिनाभरात नऊ हिंदूच्या आत्महत्या झाल्या आहेत. तिथून अनेक हिंदू आपलं घर सोडून इतर प्रदेशात जात आहेत अशी अनेक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केली होती. दरम्यान, यावरून आता ट्विट करून भाजपचे नेते नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना काश्मिरी पंडितांची चिंता आहे. पण त्याच्याच राज्यात राहणाऱ्या हिंदूंना रझा अकादमी आणि पीएफआय सारख्या दहशतवादी संघटनांकडून नेहमीच लक्ष्य केले जाते त्याचे काय? त्यांना कोण वाचवणार? काश्मीर मोदींच्या सुरक्षित हातात आहे. त्याची काळजी करू नका!! असं ट्विट भाजपचे नेते नितेश राणे यांनी केले आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापण झाल्यापासून भाजपचे नेते नितेश राणे महाविकास आघाडीवरती नेहमी आक्रमक टीका करतात. ईडीने महाराष्ट्रात कारवाई सुरू केल्यापासून महाराष्ट्रातील विरोधक सत्ताधाऱ्यांवरती जोरदार टीका करीत आहेत. राज्यात सध्या भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेली अशी अनेकदा नितेश राणेंनी टीका केली आहे.
हे पण वाचा :
भर रस्त्यात आडवा करत तरुणाचे तुकडे-तुकडे ; घटनेचा हृदय पिळवटून टाकणारा Video समोर
भरधाव एक्सप्रेसला जेसीबीचा कट ; लोको पायलटच्या सर्तकतेने मोठा अपघात टळला
मान्सून रेंगाळला ; मुंबईसह राज्यात मान्सूनची तारीख बदलली?
चांदी तब्बल १ हजार रुपयांनी स्वस्त, सोनेही झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे भाव
महिनाभरात काश्मीर खोऱ्यात नऊ पंडीतांच्या हत्या
मागच्या महिनाभरात काश्मीर खोऱ्यात नऊ पंडीतांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काश्मीर पंडीतांचा विषय देशात चर्चेत आला आहे. काश्मीर पंडीतांना शोधून मारलं जात आहे अशी ओरड होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल त्याबाबत चिंता व्यक्त केली. तिथल्या काश्मीर पंडीतांशा घर वापशीची स्वप्न दाखवली. परंतु त्यांच्या स्वप्नाचा चुराडा कशा पद्धतीने होत आहे सगळेचं पाहत आहेत अशा पद्धतीची केंद्र सरकारवरती केली.















