जळगाव – शहरातील विधानसभा निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मविप्र हाणामारी प्रकरणातील गुन्हेगारांवर “एमपीडीए’ (महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटी) कायद्यानुसार कारवाई करण्याबाबत हालचालीना वेग आला असल्याचे समजते. ते दोन जण कोण आहेत या बाबत ठोस माहिती मिळू शकली नाही.मात्र मविप्र आवारात त्या दोन जणांच्या विरुद्ध काही कर्मचारी व शिक्षकांनी जबाब पोलिसांना दिले असल्याचे कुजबुज सुरु होती. त्या दोन जणां विरोधात “एमपीडीए’ कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार होत असल्याची जोरदार चर्चा होती.
कायदा व सुव्यवस्थेसाठी या गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव प्रशासन तयार करीत आहे.
नागरिकांच्या मनातील भीती दूर होऊन शांततेत आणि निर्भय वातावरणात निवडणुका पार पडाव्यात, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याने पोलीस प्रशासनाकडून एमपीडीए अंतर्गत कारवाईचे पाऊल उचले जात असावे.