Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मल्हार हेल्प-फेअर ३ चा आज भव्य शुभारंभ मदतीचे हजारो हात आज येणार एकाच छताखाली

najarkaid live by najarkaid live
February 14, 2020
in जळगाव
0
मल्हार हेल्प-फेअर ३ चा आज भव्य शुभारंभ  मदतीचे हजारो हात आज येणार एकाच छताखाली
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – विविध क्षेत्रात कार्य करणा-या तब्बल पन्नास पेक्षा अधिक सेवाभावी संस्था आणि अबोलपणे, कुठलाही गाजावाजा न करता समाजासाठी झटणारे सेवामहर्षी यांची प्रदर्शनी म्हणजेच मल्हार हेल्प-फेअर ३ चा शुभारंभ आज सायंकाळी ५ वाजेला सागर पार्क, जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या निमित्ताने मदत देणारे आणि घेणारे असे मदतीचे हजारो हात एकाच छताखाली एकत्र येत आहेत. 

लाईफ इज ब्युटीफुल फाऊंडेशन आणि मल्हार कम्युनिकेशन्स द्वारा आयोजित हेल्प-फेअर ३ मध्ये जळगाव जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक, अंध – दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग यात असणार आहे.आतापर्यंत पन्नास पेक्षा अधिक संस्थांची आणि सेवा महर्षींची हेल्प-फेअर ३ साठी नोंदणी झालेली असून हेल्प-फेअरच्या या प्लॅटफॉर्मद्वारे आपले सेवा कार्य जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आणि जास्तीतजास्त लोकांना याचा लाभ देण्यासाठी या संस्था सज्ज झाल्या आहेत.

हेल्प-फेअर ३ मधील आजचे कार्यक्रम –
शुभारंभ सोहळा – समाजातील गरजू, उपेक्षित, वंचित घटकांसाठी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे संस्था चालक, कार्यकर्ते, समाजातील दानशूर व्यक्ती तसेच प्रतिष्ठित व्यक्ती आणि समाजाप्रती संवेदनशील असणाऱ्या हजारो खान्देशकरांच्या उपस्थितीत आजचा शुभारंभ सोहळा पार पडणार आहे.

प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन – हेल्प-फ़ेअर ३ च्या शुभारंभासाठी प्रमुख वक्ते म्हणून सेंटर फॉर ई – गव्हर्नन्स ट्रेनिंग अँड रिसर्चचे संचालक तसेच लोकसेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरज पोळ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

खाद्य संस्कृतीची जत्रा –
संपूर्ण प्रदर्शनी पाहण्यात बराच वेळ जात असल्याने येथे खाद्यप्रेमींसाठी खान्देशी आणि विविध खाद्य पदार्थांचे देखील स्टॉल असणार आहे. सदर फूड स्टॉल बचत गट चालविणाऱ्या महिलांना देण्यात येणार आहे, जेणेकरून त्यांच्या आर्थिक स्थैर्याच्या प्रयत्नांना पाठबळ मिळेल. सेवाक्षेत्राच्या कार्याचा आढावा घेत असतानांच सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत खाद्य संस्कृतीचा मनमुराद आनंद नागरिकांना लुटता येणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी –
सेवाकार्याच्या या कुंभमेळ्याला भेट देणाऱ्यांच्या करमणुकीसाठी येथे विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचे, संस्थांचे तसेच दिव्यांग, दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांची मेजवानी देखील असणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनीत हजारो व्यक्तींपर्यंत आपले सेवा कार्य पोहचविण्याची ही संधी असून त्याद्वारे मदत मिळविण्यास चालना मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी मानवतेच्या या मंदिरांना म्हणजेच  हेल्प-फेअरला भेट द्यावी  यात सहभाग नोंदवावा असे आवाहन मल्हार हेल्प-फेअर टीमकडून करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एअर इंडियात नोकरभरती; पदवीधर करू शकतील अर्ज

Next Post

घरोघर चिठ्ठ्या वाटणाऱ्या ‘राष्ट्रीय’ नेत्याबाबत काय बोलावं; पवारांचा खोचक टोला

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
घरोघर चिठ्ठ्या वाटणाऱ्या ‘राष्ट्रीय’ नेत्याबाबत काय बोलावं; पवारांचा खोचक टोला

घरोघर चिठ्ठ्या वाटणाऱ्या 'राष्ट्रीय' नेत्याबाबत काय बोलावं; पवारांचा खोचक टोला

ताज्या बातम्या

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

March 20, 2026
Interview Tips : इंटरव्ह्यूला जाताय… मग ही पूर्वतयारी कराच; यशासाठी तज्ज्ञांचे महत्त्वाचे टिप्स

Today Gold Rate : सोन्याच्या दरात प्रचंड उलथापलथ, तज्ज्ञांचा 30,000 रुपये प्रती तोळा होणार असा अंदाज

SSB कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

March 20, 2026
इराणनचे सात देशांमधील तेल व गॅस कंपन्यांवर जोरदार हल्ले; परिस्थिती गंभीर

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us