Railway Traffic block: मनमाड रेल्वे स्टेशन नजिक मनमाड – पुणे व मनमाड- औरंगाबाद लोहमार्गावर अंकाई व अंकाई किल्ला या रेल्वे स्टेशनवर ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान ट्रैफिक ब्लॉक घेण्यात आला आहे त्यामुळे काही रेल्वे प्रवासी गाड्या अन्य स्टेशनवर थांबविण्यात येणार आहेत .तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
या ट्रॅफिक मेगाब्लॉकमुळे काही रेल्वेगाड्या 3 दिवस रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे-निझामाबाद, निझामाबाद-पुणे , मुंबई सी.एस.टी – जालना, तसेच जालना-मुंबई सी.एस.टी या एक्सप्रेस गाड्या या ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, सिकंदराबाद-मनमाड , मनमाड-सिकंदराबाद , हुजूर साहिब नांदेड-मनमाड, मनमाड-हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेस गाड्या काही अंशी रद्द करण्यात आल्या आहेत. अंकाई व अंकाई किल्ला ही रेल्वे स्थानके पुणे, मनमाड व औरंगबाद लोहमार्गावर मनमाडपासून ६ किलोमीटर अंतरावर आहे .
शुक्रवारी 11-02-2022 ५.३० ते ८.३० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे . त्यामुळे गाडी क्र . ०७७७७/०७७७८ नांदेड – मनमाड – नांदेड डेमो एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर गाडी क्र . १७०६४ सिकंदराबाद मनमाड ही गाडी १ तास ०५ मिनिटे , गाडी क्र . १८५०३ विशाखापट्टनम शिर्डी २५ मिनिटे तर गाडी क्र . १२७१६ अमृतसर – नांदेड सचखंड एक्सप्रेस १ तास १५ मिनिटे मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकांत थांबतील.
शनिवार 12-02-2022 रोजी ५.३० ते ९ .३० गाडी क्र .७७७७ / ७७७८ नांदेड – मनमाड – नांदेड डेमो , गाडी क्र .११४० ९ / ११४१० पुणे निजामाबाद – पुणे डेमो आणि गाडी क्र .२२१४७ / २२१४८ दादर – शिर्डी दादर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत . तर गाडी क्र . १७०६४ सिकंदराबाद – मनमाड २ तास १५ मिनिटे , गाडी क्र .१७००२ सिकंदराबाद – शिर्डी २ तास ३५ मिनिटे तर गाडी क्र . १२७१६ अमृतसर नांदेड २ तास २५ मिनिटे मनमाड रेल्वे स्थानकावर थांबतील .
रविवार 13-02-2022 – रोजी ५.३० ते ११.३० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आल्याने नांदेड – मनमाड – नांदेड डेमु , पुणे – निजामाबाद – पुणे डेमु , गाडी क्र . १२०७१/१२०७२ मुंबई – जालना- मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस , गाडी क्र . १७०६४/१७०६३ सिकंदराबाद – मनमाड या गाड्यांची यात्रा एक स्टेशनआधी संपविण्यात येणार आहे . ही गाडी संध्याकाळी येथूनच सुटेल . तर गाडी क्र . ११०७८ जम्मूतावी – पुणे झेलम एक्सप्रेस २ तास मनमाड स्थानकावर थांबेल . गाडी क्र . १२७१६ अमृतसर – नांदेड सचखंड एक्सप्रेस ३ तास ३० मिनिटे मनमाड रेल्वे स्थानकांत थांबेल . गाडी क्र . १२७७ ९ वास्को – निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस ही गाडी १ तास ४५ मिनिटे सोलापूर विभागात थांबेल . गाडी क्र . १२७८० निजामुद्दी वास्को गोवा एक्सप्रेस ही मनमाड रेल्वे स्थानकांत २५ मिनिटे थांबेल . गाडी क्र . १७६१७ मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस ४० मिनिटे समिट , मनमाड स्टेशनवर थांबेल . गाडी क्र . १७२०६ काकीनाडा -शिर्डी ही गाडी नांदेड विभागात ४ तास ३५ मिनिटे इतकी वेळ थांबेल .
सोमवार दि . १४ फेब्रुवारी रोजी ५.३० ते १२ वाजेपर्यंत राहिल . या कालावधीत नांदेड – मनमाड – नांदेड डेमु , पुणे – निजामाबाद – पुणे डेमु , मुंबई – जालना जनशताब्दी आणि सिकंदराबाद – मनमाड या गाड्यांची यात्रा एक स्टेशन आधी संपविण्यात येणार आहे . या गाड्या सायंकाळी येथूनच सुटतील . तर जम्मूतावी -पुणे झेलम एक्सप्रेस २ तास ३० मिनिटे , अमृतसर – नांदेड सचखंड एक्सप्रेस ४ तास ३० मिनिटे , निजामुद्दीन – वास्को गोवा एक्सप्रेस ५५ मिनिटे , मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस १ तास मनमाड रेल्वे स्थानकांत थांबेल , अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे .
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
11409 पुणे-निझामाबाद 11-02-2022 to 13-02-2022
11410 निझामाबाद-पुणे 11-02-2022 to 13-02-2022
12071 मुंबई सी.एस.टी – जालना 12-02-2022 & 13-02-2022
12072 जालना-मुंबई सी.एस.टी 13-02-2022 & 14-02-2022
अंशत: रद्द करण्यात आलेल्या गाड्या
17064 सिकंदराबाद-मनमाड 12-02-2022 आणि 13-02-2022 नगरसोल- मनमाड
17063 मनमाड-सिकंदराबाद 13-02-2022 आणि 14-02-2022 मनमाड-नगरसोल
07777 हुजूर साहिब नांदेड-मनमाड 10-02-2022 ते 13-02-2022 औरंगाबाद-मनमाड
07778 मनमाड-हुजूर साहिब नांदेड 11-02-2022 ते 14-02-2022 मनमाड-औरंगाबाद
















