मुंबई – सेंट्रल रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास आता थंड होणार असून नवी एसी लोकल ट्रेन लवकरच रूजू होणार आहे. कुर्ला कारशेडमध्ये हि नवी एसी लोकल दाखल झाली असून जानेवारी २० मध्ये प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
मुंबई म्हटली लोकलचा प्रवास आणि या शहरातील हवामान उष्ण असल्याने लोकलमधील गर्दीचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. अशातच एसी लोकल चा प्रयोग मुंबईत होत असल्याने फायदेशीर ठरणार आहे. परंतु ही ट्रेन मध्य मार्गावरील मेन लाईनवर धावणार की ट्रान्स हार्बर लाईनवर धावणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.















