पाचोरा – पाचोरा तालुक्यातील पिंप्री ते भाजे दरम्यान अवैधरित्या वृक्षतोड करून लाकुड घेऊन पसार होत असतांना डांभुर्णीच्या इसमाने दोन ट्रॅक्टर पकडून वन विभागास कळविल्याने वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुनिल भिलावे, वनरक्षक जगदिश ठाकरे,व प्रेमराज महाजन यांनी घटनास्थळी जावून वाहने ताब्यात घेतले व वनविभागाचे कार्यालयात जमा केले, दिनांक ४ रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान शेंदुर्णी येथील खलील शेख हा विना नंबर ट्रॅक्टर चालक दिलीप छगन पाटील रा. भोजे ता. पाचोरा व शकील शेख रा. शेंदुर्णी ता. जामनेर हे अवैधरित्या वृक्षतोड करून ट्रक्टर शेंदुर्णी कडे घेऊन जात असतांना डांभुर्णी येथील संतोष परदेशी यांचे निदर्शनास आल्याने त्यांनी भ्रमणध्वनी व्दारे वन विभागाचे अधिकारी ज्ञानेश्वर देसाई यांना कळविल्याने देसाई यांनी तातडीने कर्मचारांना घटनास्थळी पाठवून लकडे भरलेले दोन ट्रक्टर जमा करुन मालक व वाहन चालकावर कारवाई केली.













