Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतविरोधी खोटी वृत्ते पसरवल्याबद्दल 35 यूट्यूब चॅनेल्स, 2 संकेतस्थळे ब्लॉक

पाकिस्तानच्या खोट्या वृत्त प्रसारणावर भारताचा प्रहार

najarkaid by najarkaid
January 22, 2022
in राष्ट्रीय
0
भारतविरोधी खोटी वृत्ते पसरवल्याबद्दल 35 यूट्यूब चॅनेल्स, 2 संकेतस्थळे ब्लॉक
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्‍ली, 22 जानेवारी –डिजिटल मीडियावर समन्वित पद्धतीने भारतविरोधी बनावट वृत्त पसरवण्यात गुंतलेल्या 35 यूट्यूब आधारित वृत्त वाहिन्या आणि 2 संकेतस्थळे ब्लॉक करण्याचे आदेश  माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आहेत. मंत्रालयाने ब्लॉक केलेल्या यूट्यूब खात्यांची एकूण सदस्य संख्या 1 कोटी 20 लाखांहून अधिक आहे आणि त्यांच्या  व्हिडिओजना 130 कोटींहून अधिक व्ह्यूज आहेत. याव्यतिरिक्त, इंटरनेटवर भारतविरोधी चुकीची माहिती पसरवण्यात समन्वित सहभागाबद्दल दोन ट्विटर खाती, दोन इंस्टाग्राम खाती आणि एक फेसबुक खातेदेखील  सरकारने ब्लॉक केले आहे.

माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम, 2021 च्या नियम 16 अंतर्गत जारी केलेल्या पाच स्वतंत्र आदेशांनुसार, मंत्रालयाने ही पाकिस्तान स्थित सोशल मीडिया खाती आणि संकेतस्थळे  ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय गुप्तचर संस्था या सोशल मीडिया अकाऊंट्स आणि वेबसाइट्सवर बारकाईने लक्ष ठेवून होत्या आणि त्यांनी तात्काळ कारवाईसाठी ती चिन्हांकित केली होती.

काम करण्याची पद्धत : समन्वित अपप्रचार नेटवर्क्स

मंत्रालयाने ब्लॉक केलेली सर्व 35 खाती पाकिस्तानातून कार्यरत होती आणि चार समन्वयित अपप्रचार नेटवर्क्सचा  भाग होती.

ही सर्व नेटवर्क्स खोटी वृत्त पेरून भारतीय प्रेक्षकांची दिशाभूल करणे या एकाच ध्येयाने चालवली जात असल्याचे दिसून आले. नेटवर्कचा भाग असलेल्या वाहिन्या कॉमन हॅशटॅग आणि समान संपादन शैली वापरत होत्या. त्या सामान्य व्यक्तींद्वारे संचालित होत्या आणि एकमेकांच्या सामग्रीचा प्रचार करत होत्या. काही यूट्यूब वाहिन्या  पाकिस्तानी टीव्ही वृत्तवाहिन्यांचे निवेदक चालवत होते.

सामग्रीचे स्वरूप

मंत्रालयाने ब्लॉक केलेल्या यूट्यूब वाहिन्या, संकेतस्थळे  आणि इतर सोशल मीडिया खाती पाकिस्तानकडून  भारताशी संबंधित संवेदनशील विषयांवर भारतविरोधी खोटी वृत्ते पसरवण्यासाठी वापरल्या जात होत्या. यामध्ये भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर आणि इतर देशांसोबतचे भारताचे परराष्ट्र संबंध यासारख्या विषयांचा समावेश आहे. माजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या निधनाबाबत यूट्यूब चॅनेलवरून मोठ्या प्रमाणावर खोटी वृत्त पसरवण्यात आल्याचे दिसून आले. या यूट्यूब वाहिन्यांनी पाच राज्यांतील आगामी निवडणुकांच्या लोकशाही प्रक्रियेला खीळ घालण्यासाठी आशय पोस्ट करण्यास सुरुवात केली होती.

या वाहिन्यांनी फुटीरतेला खतपाणी घालणारा, धर्माच्या आधारे भारताचे विभाजन करणारा आणि भारतीय समाजातील विविध समुदायांमध्ये वैर निर्माण करणाऱ्या  सामग्रीचा प्रचार केला.

ही कारवाई, सरकारने अलीकडेच डिसेंबर, 2021 मध्ये 20 यूट्यूब वाहिन्या आणि 2 संकेतस्थळे ब्लॉक केल्याच्या अनुषंगाने आहे. तेव्हा माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 अंतर्गत आपत्कालीन अधिकारांचा वापर अशा भारतविरोधी खोट्या वृत्त जाळ्यांवर कारवाई करण्यासाठी पहिल्यांदा केला गेला.

Spread the love
Tags: पाकिस्तानच्या खोट्या वृत्त प्रसारणावर भारताचा प्रहार
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात ५ फेब्रुवारीपर्यंत मनाई आदेश लागू

Next Post

भुसावळ येथे मध्य रेल्वेत भरती ; २४२२ पदे ; १० वी पास ; आजच करा अर्ज

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय !

भुसावळ येथे मध्य रेल्वेत भरती ; २४२२ पदे ; १० वी पास ; आजच करा अर्ज

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us