मुंबई- भाजप आणि शिवसेनेला राज्यातील जनतेने सत्ता स्थापनेचा कौल दिला असून आम्हाला विरोधी पक्ष बनण्याची सुसंधी दिली आहे. हे लक्षात घेऊन आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून विधानसभेत काम करू, असे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवार यांनी सर्व तर्ककुतर्कांना पूर्णविराम दिला. भाजप आणि शिवसेनेने राज्या निर्माण झालेल्या सत्ता स्थापनेच्या पेचावर लवकरात लवकर मार्ग काढून राज्यात सरकार स्थापन करावे,असा वडीलकीचा सल्लाही शरद पवार यांनी दोन्ही पक्षांना दिला आहे. पवार पत्रकार परिषदेत बोलत होते.
संजय राऊत यांनी आपली सकाळी भेट घेतली मात्र या भेटीत आमची राज्यसभेच्या अधिवेशनावर चर्चा झाल्याचे, पवार राऊत भेटीबाबतच्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले. राऊत यांनी सत्ता स्थापनेबाबतचा कोणताही प्रस्ताव आपल्याला दिला नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पक्ष आणि सेनेला गेली २५ वर्षे एकत्र राहिलेले पक्ष असून त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि दोन्ही पक्षांनी मिळून सरकार बनवावे, असे पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध पक्षात बसण्याचाच निर्णय लोकांनी दिला आहे. आम्ही आणि काँग्रेस १०० या आकड्याच्या पुढे जात नाही, त्या मुळे आमचे सरकार कसे बनेल, असे पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले आणि विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचे आपले म्हणणे पुन्हा अधोरेखित केले.
आपण कधीही मुख्यमंत्री बनणार नाही’
आपण राज्याचे मुख्यमंत्री बनणार का, असा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री बनण्याची जराही ईच्छा नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. आपण या राज्याचे ४ वेळा मुख्यमंत्री बनलो आहोत. आता यापुढे आपण मुख्यमंत्री बनणार नसल्याचे पवार म्हणाले.
आपण कधीही मुख्यमंत्री बनणार नाही’
आपण राज्याचे मुख्यमंत्री बनणार का, असा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री बनण्याची जराही ईच्छा नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. आपण या राज्याचे ४ वेळा मुख्यमंत्री बनलो आहोत. आता यापुढे आपण मुख्यमंत्री बनणार नसल्याचे पवार म्हणाले.














