Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजप बंडोबांच्या चक्रव्यूहात; खडसे समर्थक आक्रमक, ‘अपक्ष लढा’ म्हणून आग्रह

najarkaid by najarkaid
October 3, 2019
in राजकारण, जळगाव
0
भाजप बंडोबांच्या चक्रव्यूहात; खडसे समर्थक आक्रमक, ‘अपक्ष लढा’ म्हणून आग्रह
ADVERTISEMENT

Spread the love

बुधवारी सायंकाळपर्यंत वाट पाहिली; पक्षाचा निरोप नाही, दुसर्‍या यादीतही नाव नाही
जळगाव – भाजपच्या पहिल्या यादीत नाव नसल्यामुळे व दुसर्‍या दिवशीपर्यंत याबाबत पक्षाकडून काहीही निरोप नसल्यामुळे एकनाथ खडसे यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. तुम्ही अपक्ष लढाच’, असा आग्रह समर्थकांनी सुरू केला आहे. स्वत: खडसे हे मुलगी अ‍ॅड. रोहिणी खडसे व पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यासह मुक्ताईनगर येथील फार्महाऊसवरच होते. घराबाहेर दिवसभर समर्थक आणि कार्यकर्त्यांचा ठिय्या होता.
दिवसभर समर्थक, विविध पक्षांचे पदाधिकारी त्यांना भेटून गेले. कार्यकर्त्यांनी मुंबई-नागपूर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. मंदाकिनी खडसे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. खडसेंच्या स्नुषा सकाळीच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीसाठी रवाना झाल्या होत्या. दरम्यान, नाराज एकनाथ खडसेंना जाळ्यात ओढण्यासाठी राष्ट्रवादीचे काही नेते त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.
सायंकाळपर्यंत वाट पाहा, असा दिला होता सल्ला- उमेदवारी न मिळाल्यामुळे आक्रमक कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला देत खडसे यांनी 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत वाट पाहण्याचा सल्ला दिला होता. दुसरी यादी येणार असल्याने खडसे सकाळपासून मुक्ताईनगरमध्येच होते. खा. रक्षा खडसे प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला गेल्या होत्या. मात्र, दुसर्‍या यादीतही खडसे यांचे नाव आले नाही. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पुण्यात याबाबत पत्रकारांशी बोलताना गोल-गोल उत्तर दिले.
बुधवारी सायंकाळपर्यंत वाट पाहिली; पक्षाचा निरोप नाही, दुसर्‍या यादीतही नाव नाही
फार्महाऊसवर मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, रावेर येथील भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. काँग्रेसचे माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार रमेश चौधरी, जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, भुसावळचे राष्ट्रवादीचे सतीश घुले आदींनी खडसे यांची भेट घेतली. माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकार्‍यांसोबत आमदार खडसे यांनी बंद खोलीत दहा मिनिटे चर्चा केली. खडसेंची भिस्त त्यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांच्यावर होती. मंत्रिपद गेले तेव्हा रक्षा खडसे यांनी खडसेंसाठी दिल्लीत शिष्टाई केली होती, या वेळीदेखील खडसेंसाठी त्याच महत्त्वाच्या दूत बनल्या आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून त्या माध्यमांपासून लांब राहिल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खडसेंच्या संपर्कात
जळगाव – भाजपने दुसर्‍या यादीतही खडसेंची उमेदवारी जाहीर केली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते नाराज खडसेंना जाळ्यात ओढण्याच्या प्रयत्नात आहेत. राष्ट्रवादीने बुधवारी पहिली यादी जाहीर केली. त्यात मुक्ताईनगरमधून उमेदवार दिला नाही. अ‍ॅड. रवींद्र पाटील हे येथील संभाव्य उमेदवार होते. त्यांनाही तूर्त अर्ज दाखल करू नये, अशी सूचना दिल्याचे समजते.
औरंगाबाद पश्चिममधून काँग्रेसचे रमेश गायकवाड, सिल्लोडमधून पालोदकर
काँग्रेसने बुधवारी रात्री उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यात औरंगाबाद पश्चिममधून रमेश गायकवाड, सिल्लोडमधून प्रभाकर पालोदकर तर परभणीतून रविराज अशोक देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
…इकडे दादांची गाडी अडवण्याचा प्रयत्न
मुंबई – भाजपच्या पहिल्या यादीत उदगीरचे विद्यमान आमदार सुधाकर भालेराव यांचे नाव नसल्यामुळे समर्थक संतापले आहेत. याचा जाब विचारण्यासाठी भालेराव समर्थकांनी बुधवारी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी धडक मारली. तोपर्यंत पाटील गाडीतून पुण्याकडे निघाले होते. यामुळे संतप्त समर्थकांनी पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रात्री उशिरा भाजपने उदगीरमधून अनिल कांबळे यांची उमेदवारी जाहीर केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अशोक चव्हाण यांचा विधानसभा निवडणुकीतील नवा नारा; ‘तब लडे थे गोरों से, अब लडेंगे चोरों से

Next Post

सन ऑफ अर्थ’मध्ये जळगावचा झेंडा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
सन ऑफ अर्थ’मध्ये जळगावचा झेंडा

सन ऑफ अर्थ’मध्ये जळगावचा झेंडा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us