नवी दिल्ली: भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी गुरुवारी लखीमपूर खेरी घटनेचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात घटना अधिक स्पष्टपणे दिसत आहेत. गांधींनी व्हिडिओ ट्वीट करून म्हटले की, ज्यांनी निरपराध शेतकऱ्यांचे रक्त सांडले त्यांना न्याय द्यावा लागेल.
दरम्यान, या व्हिडिओची अद्याप पुष्टी झालेली नाही. लखीमपूर खेरी हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जण ठार झाले. गांधींनी व्हिडिओ ट्वीट करून म्हटले कि , ‘हा व्हिडिओ आरशासारखा स्पष्ट आहे. तुम्ही आंदोलकांना मारून त्यांना शांत करू शकत नाही. निष्पाप शेतकऱ्यांचे रक्त सांडण्याच्या घटनेसाठी जबाबदारी निश्चित करावी लागेल. प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात उग्रता आणि निर्दयीपणाची भावना येण्यापूर्वी त्यांना न्याय मिळालाच पाहिजे.
लखीमपूर खेरीच्या या 45 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की शेतकरी काळे झेंडे घेऊन रस्त्यावर पुढे जात आहेत आणि त्याच वेळी थार कार निघून जाते, त्यांना खूप वेगाने तुडवत आहे. हल्लेखोर वाहनाबरोबरच ताफ्यातील आणखी दोन वाहने वेगाने निघतात.
The video is crystal clear. Protestors cannot be silenced through murder. There has to be accountability for the innocent blood of farmers that has been spilled and justice must be delivered before a message of arrogance and cruelty enters the minds of every farmer. ???????????????? pic.twitter.com/Z6NLCfuujK
— Varun Gandhi (@varungandhi80) October 7, 2021
वरुण गांधी यांनी बुधवारी दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिले, ‘लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वाहनांनी चिरडण्याचा हा व्हिडिओ कोणाच्याही आत्म्याला हादरवून टाकेल. पोलिसांनी या व्हिडिओची दखल घ्यावी आणि या वाहनांचे मालक, त्यांच्यामध्ये बसलेले लोक आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींना ताबडतोब अटक करावी.