मुंबई-भाजपा प्रदेश माध्यम विभागातर्फे प्रस्तूत करण्यात आलेल्या भाजपा संदर्भ पुस्तिकेचे आज मा. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी माध्यम विभाग प्रमुख व प्रदेश सह-मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. किरीट सोमैय्या, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा, प्रदेश प्रवक्ते अतुल शाह उपस्थित होते. संदर्भ पुस्तिकेतून पत्रकारांसाठी उपयुक्त अशी संख्यात्मक माहिती ह्यातून देण्यात आली आहे.