Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बोदवड: राष्ट्रवादीच्या पॅनलने १८ पैकी तब्बल १७ जागा जिंकल्या ; खडसेनां मोठं यश

najarkaid live by najarkaid live
April 30, 2023
in जळगाव
0
बोदवड: राष्ट्रवादीच्या पॅनलने १८ पैकी तब्बल १७ जागा जिंकल्या ; खडसेनां मोठं यश
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड,(प्रतिनिधी)- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज लागला असून यात राष्ट्रवादी प्रणीत पॅनलने  १८ पैकी तब्बल १७ जागा जिंकून दणदणीत विजय संपादन केला असून यामुळे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना धक्का बसला आहे.

बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यासह भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव परिसराचा समावेश आहे. यामुळे तीन तालुक्यांची एकमेव बाजार समिती म्हणून या मार्केट कमिटीचा लौकीक आहे. अर्थात, याचमुळे ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली जात होती. गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकांपासून आमदार एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून बाजार समिती ही भाजपकडे होती. आता ते राष्ट्रवादीत असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे स्वतंत्र पॅनल उभे केले. या पॅनलला पहिल्यांदा महाविकास आघाडी पॅनले संबोधण्यात आले असले तरी कॉंग्रेसच्या उमेदवारांना यात स्थान मिळाले नाही.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या पॅनलला शिवसेना व भाजपच्या पॅनलने तगडे आव्हान उभे केले होते. या माध्यमातून आमदार एकनाथराव खडसे विरूध्द आमदार चंद्रकांत पाटील असा सामना देखील रंगला होता. निवडणुकीच्या काळात दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. या अनुषंगाने निवडणूक चुरशीची झाली.

आज सकाळी दहा वाजता या निवडणुकीच्या मतमोजणीस प्रारंभ झाला. यात दोन्ही पॅनलमध्ये चुरस निर्माण होईल अशी अपेक्षा होती. तथापि, असे झाले नाही. येथे राष्ट्रवादीच्या पॅनलने १८ पैकी तब्बल १७ जागा जिंकून दणदणीत विजय संपादन केला. तर महायुतीच्या पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. या विजयामुळे एकनाथराव खडसे यांना मोठा दिलासा मिळाला असून आमदार चंद्रकांत पाटील यांना धक्का बसला आहे. या निवडणुकीत नाथाभाऊंच्या सोबतीचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील व नेत्या रोहिणी खडसे तसेच सर्व सहकाऱ्यांनी जोरदार काम केले. नाथाभाऊं

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत

Next Post

भारत गौरव पर्यटक रेल्वेचे चाळीसगाव स्टेशनवर ढोल ताशांच्या गजरात स्वागत

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
भारत गौरव पर्यटक रेल्वेचे चाळीसगाव स्टेशनवर ढोल ताशांच्या गजरात स्वागत

भारत गौरव पर्यटक रेल्वेचे चाळीसगाव स्टेशनवर ढोल ताशांच्या गजरात स्वागत

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us