तीन दिवसांची पोलीस कोठडी
जळगाव ;- फुले मार्केटमध्ये आमिल शेख मजीद कुरेशी या तरुणावर रात्री दोनजणांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली होती . याप्रकरणी शहर पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे . फुले मार्केट येथे १६ रोजी आमिल शेख माजिद या तरुणाला सुनील दुर्योधन सैंदाणे उर्फ भाचा वय २४ रा. असोदा रोड जळगाव आणि कैलास मनोहरसिंग राजपूत उर्फ लल्ला बिल्डर रा. शिवाजीनगर या दोघांना १६ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी अटक केली . त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास पोलीस करत आहे.