Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्लास्टिक कारखान्यात ३० लाखांची वीजचोरी उघड

पुणे जिल्ह्यातील प्रकार;महावितरणच्या भरारी पथकाची कामगिरी

najarkaid by najarkaid
July 29, 2021
in राज्य
0
महावितरण

महावितरण

ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. २९ जुलै २०२१ : वीजमीटरसह वीजयंत्रणेत फेरफार करून खेड तालुक्यातील (जि. पुणे) मेसर्स ए. टी. प्लास्टिक कारखान्यामध्ये गेल्या १८ महिन्यांपासून सुरु असलेली २९ लाख ७६ हजार रुपयांची वीजचोरी महावितरणच्या भरारी पथकाने उघडकीस आणली आहे. वीजचोरी व दंडाच्या एकूण ५२ लाख ९६ हजार रुपयांच्या वीजबिलाचा भरणा न केल्यामुळे या कारखान्याच्या मालकाविरुद्ध बुधवारी (दि. २८) चाकण पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, महाळुंगे (ता. खेड, जि. पुणे) येथे मेसर्स ए. टी. प्लास्टिक प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात प्लास्टिकच्या वस्तुंची निर्मिती केली जाते. या कारखान्यासाठी ग्राहकाच्या मागणीनुसार महावितरणकडून १०० अश्वशक्ती क्षमतेची उच्चदाब वीजजोडणी देण्यात आली आहे. मात्र या कारखान्यातील वीजवापराबाबत महावितरणच्या अद्यावत तंत्रज्ञानाद्वारे केलेल्या विश्लेषणातून संशय निर्माण झाला होता. त्यानुसार महावितरणच्या पुणे ग्रामीण भरारी पथकाने या कारखान्यातील वीजमीटर व संचाची तपासणी केली. यात कारखान्यामध्ये तब्बल 232 अश्वशक्ती जोडभाराचा अनधिकृत वीजवापर तसेच वीजमीटरमध्ये फेरफार आढळून आला. गेल्या 18 महिन्यांपासून सुरु असलेल्या या प्रकारामध्ये १ लाख ८५ हजार ११ युनिटची म्हणजे २९ लाख ७६ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे निदर्शनात आले.

वीजचोरी प्रकरणी महावितरणकडून वीजचोरीच्या दंडाचे २३ लाख २० हजार रुपये आणि वीजचोरीचे २९ लाख ७६ हजार रुपयांचे बिल सदर कारखान्यास देण्यात आले. मात्र दिलेल्या मुदतीत दंडाची रक्कम भरली नसल्याने बुधवारी (दि. २८) या कारखान्याच्या मालकाविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारखान्यातील वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे पुणे परिक्षेत्राचे उपसंचालक कमांडर शिवाजी इंदलकर यांच्या मार्गदर्शनात पुणे ग्रामीण भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गोपाळ पाटील, सहायक अभियंता संजय जाधव, सहायक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी शुभांगी पतंगे, तंत्रज्ञ महेश दरेकर यांनी ही कामगिरी केली.

Spread the love
Tags: #mahavitaran #महावितरण #वीज #मिटर
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात निर्बंध शिथिल?

Next Post

अमेझॉन व फ्लिपकार्टला अन्न व औषध प्रशासनाने ‘या’ कारणासाठी दिली नोटीस

Related Posts

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Next Post
अमेझॉन  व फ्लिपकार्टला अन्न व औषध प्रशासनाने ‘या’ कारणासाठी दिली नोटीस

अमेझॉन व फ्लिपकार्टला अन्न व औषध प्रशासनाने 'या' कारणासाठी दिली नोटीस

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us