- प्रिंप्राळा, हुडको, समतानगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या कॉर्नर बैठकांवर भर
- शहराच्या विकासासाठी अभिषेक पाटील यांना निवडून द्या : बैठकांमधून मतदारांना अवाहन

जळगाव ;- जळगाव शहराच्या विकासासाठी नवीन व्हिजन फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी पक्षाकडे आहे.पक्षाने अभिषेक पाटील सारखा उच्चशिक्षित उमेदवार दिला असून येत्या काळात शहराचा कायापालट करून विकास करायचा आहे.शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांना मतदान करा असे अवाहन आज शहरातील प्रिंप्राळा, हुडको, समतानगर येथील कॉर्नर बैठकांमधून मीनल पाटील, जयश्री पाटील, वैशाली पाटील, अशा येवले या महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.या कॉर्नर बैठकांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

कॉर्नर बैठकांमधून सांगण्यात आले की, आघाडीचे उमेदवार यांना संधी दिल्यास जनतेचा सेवक म्हणून काम करून दाखवतील तसेच शहरवासीयांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी कायम संपर्कात राहुन प्रश्न मार्गी लावतील अशा आपल्या हक्काच्या माणसाला संधी द्या असे अवाहन करण्यात आले.
जळगावात ३७० च्या मुद्यावर भाषण झाले परंतू जळगावकरांच्या समस्यांवर भाजप काहीही बोलत नाही. जळगावकरांना विकास हवा आहे देशाची निवडणुक ३७० च्या मुद्यावर झाली आता या निवडणुकीत पुन्हा तोच मुद्दा पुढे केला गेला. जळगावकरांना विकास हवा आहे. २०१४ ला दिलेले आश्वासने आणि मनपा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची खैरात भाजपाने पुर्ण केलेली नाही. ही जनता विसरलेली नाही. म्हणून महाआघाडीच्या पाठीशी जनता उभी राहील असा विश्वास राष्ट्रवादी कॉँग्रेसचे महिला महिला पदाधिकारी यांनी असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच आघाडीचे जळगाव शहरातील उमेदवार अभिषेक पाटील यांच्या प्रचाराला युवावर्गाची प्रचंड साथ मिळत असून त्यांना विजयी करण्याचा संकल्प केला आहे.














