Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्राप्तिकर विभागाच्या ‘त्या’ छापेमारित मोठे घभाड !

najarkaid by najarkaid
March 18, 2022
in राज्य
0
बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट नेटवर्क चालवणाऱ्या व्यावसायिकाला अटक
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – प्राप्तिकर विभागाने 08.03.2022 रोजी मुंबईतील एक केबल ऑपरेटर, राज्य सरकारी कर्मचारी आणि त्याच्याशी संबंधित व्यवसायांवर छापे टाकले. मुंबई, पुणे, सांगली आणि रत्नागिरीमधील एकूण 26 ठिकाणी ही शोधमोहीम राबवण्यात आली.

शोधमोहिमेदरम्यान  असे आढळून आले की दापोली येथील एक भूभाग महाराष्ट्रातील एका प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीने 2017 मध्ये 1 कोटी रुपयांच्या मोबदल्यात खरेदी केला होता पण त्याची नोंदणी 2019 मध्ये झाली. ही जमीन नंतर 2020 मध्ये शोधमोहीम कारवाईत समाविष्ट असलेल्या एका व्यक्तीला 1.10 कोटी रुपयांच्या मोबदल्यात विकली गेली. याच जमिनीवर 2017 ते 2020 या कालावधीत रिसॉर्ट बांधण्यात आले. त्या राजकीय व्यक्तीच्या नावावर जमिनीची नोंदणी होईपर्यंत रिसॉर्टचे बऱ्याच अंशी बांधकाम पूर्ण झाले होते. नंतर, 2020 मध्ये जेव्हा राजकारण्याने केबल ऑपरेटरला मालमत्ता विकली तेव्हा रिसॉर्ट जवळजवळ पूर्ण झाले होते. असे दिसून येते की रिसॉर्टच्या बांधकामाविषयीची संबंधित वस्तुस्थिती नोंदणी अधिकाऱ्यांना कळविण्यात आली नव्हती आणि त्यानुसार, 2019 आणि 2020 या दोन्ही वेळेला जमिनीच्या नोंदणीसाठी केवळ मुद्रांक शुल्क भरले गेले. शोधमोहिमेदरम्यान सापडलेल्या पुराव्यावरून असे दिसून आले आहे की रिसॉर्टचे बांधकाम 2017 मध्ये सुरू झाले आणि रिसॉर्टच्या बांधकामासाठी 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम खर्च करण्यात आली. त्याच्या बांधकामाच्या खर्चाचा हिशोब, ज्या व्यक्तीकडे शोधमोहीम राबवली गेली होती त्या व्यक्तीने किंवा राजकारणी व्यक्तीने त्यांच्या हिशोबाच्या वहीत दाखवलेला नाही.

राज्य सरकारच्या अधिकाऱ्याच्या प्रकरणात शोध घेतला असता, त्यांनी, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि नातेवाईकांनी गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत पुणे, सांगली आणि बारामती येथील मोक्याच्या ठिकाणी मालमत्तांच्या स्वरूपात प्रचंड संपत्ती जमा केल्याचे उघड झाले आहे. कुटुंबाच्या मालकीचा पुण्यात एक बंगला आणि एक फार्म हाऊस, तासगावमध्ये एक भव्य फार्म हाऊस, सांगलीत दोन बंगले, तनिष्क आणि कॅरेट लेन शोरूम असलेली दोन व्यावसायिक संकुले, पुण्यातील विविध ठिकाणी पाच फ्लॅट, नवी मुंबईत एक फ्लॅट, सांगली, बारामती, पुणे येथे रिक्त भूखंड आणि गेल्या सात वर्षांत 100 एकरहून अधिक शेतजमीन आहे. मालमत्तेच्या संपादनाचे स्त्रोत आणि दुकाने आणि बंगल्यांच्या भव्य आतील भागांवर खर्च केलेल्या रकमेची तपशीलवार तपासणी प्रगतीपथावर आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचे शोरूम, तनिष्क शोरूम, नागरी बांधकाम व्यवसाय, रिअल इस्टेट आणि पाईप उत्पादन व्यवसाय यासह अनेक व्यवसाय या कुटुंबाच्या मालकीचे आहेत.

कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांकडून चालवल्या जाणाऱ्या बांधकाम व्यवसायाला राज्य सरकारकडून अनेक कंत्राटे मिळाल्याचे आढळून आले आहे. बोगस खरेदी आणि बोगस उप-करारांच्या माध्यमातून कराराच्या खर्चात वाढ दाखवून 27 कोटी रुपये खर्च झाल्याचा पुरावा देखील शोध मोहिमेत उघड झाला आहे. बारामती येथील जमीन विक्रीतूनही 2 कोटी रुपयांच्या बेहिशेबी रोख पावतीबाबत पुरावा हाती लागला आहे. बांधकाम व्यवसायातील करचुकवेगिरीबाबत पुढील तपास सुरू आहे.

झडती कारवाईमुळे 66 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. शोध मोहिमेदरम्यान जप्त केलेला डिजिटल डेटा आणि कागदोपत्री पुरावे यांचे अधिक विश्लेषण केले जात असून पुढील तपास सुरू आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज..!

Next Post

जळगाव जिल्हात प्रथमच राजपूत समाजाच्या क्रिकेट प्रीमियर लीगचे आयोजन

Related Posts

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Next Post
जळगाव जिल्हात प्रथमच राजपूत समाजाच्या क्रिकेट प्रीमियर लीगचे आयोजन

जळगाव जिल्हात प्रथमच राजपूत समाजाच्या क्रिकेट प्रीमियर लीगचे आयोजन

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us