Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील सहभागी शेतकऱ्यांनी किसान क्रेडीट कार्ड काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

najarkaid live by najarkaid live
February 11, 2020
in जळगाव
0
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील सहभागी शेतकऱ्यांनी किसान क्रेडीट कार्ड काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
ADVERTISEMENT

Spread the love

        जळगांव – शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत जळगांव जिल्ह्यात 4 लाख 78 हजार 109 शेतकरी लाभार्थी आहेत. जे लाभार्थी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत सहभागी आहेत, परंतु त्यांना अजूनही किसान क्रेडीट कार्ड (KCC) मिळाले नाहीत. अशा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध व्हावे, याकरीता विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत. त्याचबरोबर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत ज्या पात्र लाभार्थी शेतक-यांनी अद्याप कोणत्याही  वित्तीय संस्था व बँकाकडून पीक कर्ज घेतलेले नाही. अशा शेतक-यांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहनही डॉ. ढाकणे यांनी केले आहे.

            देशातील शेतक-यांना बँकिंग क्षेत्राकडून पीककर्ज उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी  विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्हा अग्रणी बँक अधिकारी अरुण प्रकाश, नाबार्डचे व्यवस्थापक श्रीकांत झांबरे, सहकार उपनिबंधक मेघराज राठोड व  या यंत्रणेतील सर्व संबधितअधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करून संबंधितांना विशेष मोहिम राबविण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व बँक शाखाधिकारी यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करुन शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण जाणवणार नाही, याची दक्षता घेण्याचेही निर्देशही दिले आहेत.

            शासनाच्या योजनांचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ घेता यावा यासाठी आयबीए संस्थेकडून एक पानी अर्जाचा नमुना सर्व बॅकांना उपलब्ध्‍ा करुन देण्यात आलेला आहे. लाभर्थी शेतक-यांनी या अर्जासोबत शेतीचे उतारे व कर्ज नसलेबाबतचे घोषणापत्र घेऊन ज्या बॅकेतून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्या बॅकेंत संपर्क साधावा. कोणत्याही बँक अथवा वित्तीय संस्था येथून पीक कर्ज न घेतलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज प्रोसेसिंग चार्जेस व निरीक्षण खर्च बँकांकडून माफ करण्यात येणार आहे. परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह  प्राप्त झाल्यापासून 15 दिवसामध्ये शेतक-यांना बँकांमार्फत किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) योजनेतंर्गत पीक कर्ज उपलबध करुन देण्यात येणार आहे.

 सर्व तलाठी, बँक सखी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी गाव पावतळीवर यासाठी विशेष मोहिम राबवून आपल्या कार्यक्षेत्रातील बँकांना सर्वतोपरी सहकार्य करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रावेरातील महाराष्ट्र एस.टी.कामगार सेनेच्या पदाधिकार्‍यांचे राजीनामे

Next Post

5 ग्रामपंचायतींचे 12 सदस्य अपात्र

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
5 ग्रामपंचायतींचे 12 सदस्य अपात्र

5 ग्रामपंचायतींचे 12 सदस्य अपात्र

ताज्या बातम्या

SSB कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

March 20, 2026
इराणनचे सात देशांमधील तेल व गॅस कंपन्यांवर जोरदार हल्ले; परिस्थिती गंभीर

इराणनचे सात देशांमधील तेल व गॅस कंपन्यांवर जोरदार हल्ले; परिस्थिती गंभीर

March 20, 2026
‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

March 20, 2026
कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ

कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ

March 20, 2026
शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

March 19, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us