राज्यात होतं असलेल्या पोलीस शिपाई भरतीच्या परीक्षेचा पॅटर्न ठरला असून ही भरती प्रक्रिया होणार तरी कशी? याबाबत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना परीक्षा कशी होणार त्याचं पॅटर्न कसं असणार याबद्दलचे प्रश्न तरुणांना पडले होते.मात्र पदभरतीचं संपूर्ण परीक्षेचं पॅटर्न अखेर ठरलं आहे.महाराष्ट्र पोलीस भरती 2022 प्रक्रियेत दोन चाचण्या घेण्यात येणार आहेत. यामध्ये शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी होणार आहे. सुरुवातीला उमेदवारांची शारीरिक परीक्षा होणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे.
पोलीस भरतीची संपूर्ण परीक्षा मराठी मधून होणार असून 100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे. त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल.
पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील.
© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143
WhatsApp us