पुणे : विद्येच माहेर घर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून ही घटना सर्वांनाच हादरवून सोडणारी आहे. एका खासगी सावकाराने पती समोरच पत्नीवर बलात्कार केला. कर्जाची परतफेड करता आली नाही, म्हणून त्याने कर्ज घेणाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार केला. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. इम्तियाज हसीन शेख असे नराधम संशयित आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीला आरोपीने कर्ज दिलं होतं. कर्जाचे हे पैसे फिर्यादीचा पती परत करू शकला नाही आरोपी सावकाराने फिर्यादी आणि तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी दिली होती. आरोपींने दोघांना भेटायला बोलवलं व पती समोरच पत्नीवर बलात्कार केला. फिर्यादीचा पती तिला वाचवण्यासाठी येईल म्हणून आरोपीने त्याला चाकूचा धाक दाखवला. जेणेकरुन त्याला जागेवरुन हलता आलं नाही.
हे पण वाचा..
शेतात हे पीक पिकवा अन् शासनाकडून बक्षीसही मिळवा ; शेतकऱ्यांनी असे व्हावे सहभागी?
दिल्ली विमानतळावर स्पाइस जेटच्या विमानाला आग ; पहा थरकाप उडवणारा VIDEO
बळीराजाच्या अडचणी सोडवण्यासाठी आता व्हाट्सॲप क्रमांक जाहीर
सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारच्या कारभारावर ओढले ताशेरे ; म्हणाले ..
फिर्यादीच्या पतीला समोर बसून चाकूचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी देत फिर्यादी सोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. त्याने संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.















