पाचोरा – येथील नगर परिषदेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन समारंभ व लोकार्पण सोहळा पाचोरा भडगाव मतदारसंघातील शिवसेना आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आला होता.
यावेळी आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, न.पा. मुख्याधिकारी सोमनाथ आढाव, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, नगरसेवक सतिष चेडे, शितल सोमवंशी, राम केसवानी, आनंद पगारे, धर्मेंद्र चौधरी, बापु हटकर, दादाभाऊ चौधरी, किशोर बारावकर, अॅड. अभय पाटील, रवि केसवानी, लक्ष्मी कन्स्ट्रेक्शनचे संजय कुमावत, रहेमान तडवी, विष्णु अहिरे, पप्पु राजपुत, जितेंद्र पेंढारकर, वैभव राजपुत, नाना वाघ, सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार किशोर पाटील यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तद्नंतर महात्मा गांधी वाचनालय लोकार्पण, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे चौक लोकार्पण, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प साईट लोकार्पण, पुनगाव रोड शिवाजी चौक ते कृष्णापुरी चौफुली रस्ता काँक्रिटीकरण, मानसिंगका कॉर्नर ते जारगाव चौफुली रस्ता काँक्रिटीकरण, शिवाजी चौक ते एम. एम. कॉलेज रस्ता काँक्रिटीकरण, आदर्श नगर – वडगाव रोड परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण, प्रभाग क्रमांक 1 मधील गणेश कॉलनी घोरपडे नगर व प्रभाग क्रमांक सहा मध्ये गुरुदत्त नगर मधील खुल्या जागा बगीच्या फेवर बसविणे अशा अनेक विविध कामाचे उद्घाटन संपन्न झाले.