Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंढरपूर येथून श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे २७ पासून मुक्ताईनगरकडे प्रस्थान

najarkaid by najarkaid
May 25, 2019
in जळगाव
0
पंढरपूर येथून  श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे २७ पासून मुक्ताईनगरकडे प्रस्थान
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती व श्री संत मुक्ताबाई संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे सोमवार, दि.२७ मे रोजी श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान होत आहे. २९ रोजी श्रीक्षेत्र कोथळी येथे संत मुक्ताई अंतर्धान सोहळ्यास श्री पांडुरंग पालखी सोहळ्याची हजेरी राहणार आहे.
या बाबत श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी महिती देताना सांगितले की, श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र मुक्ताईनगर हा परंपरेने सुरू असलेला पालखी सोहळा श्री संत मुक्ताबाई यांच्या अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी सोमवार, २७ मे रोजी सकाळी ६ वाजता श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान करणार आहे. श्री पांडुरंग पादुकांची सकाळी ६ वाजता विधीवत पूजा झाल्यानंतर मंदिरे समितीच्या वतीने मानकऱ्यांचा सन्मान होईल व हा सोहळा श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान करेल.
२७ रोजी सकाळी ९ वाजता करमाळा, दुपारी १२ अहमदनगर, सायंकाळी ४ वाजता नेवासा फाटा मार्गे सायकाळी ७ वाजता औरंगाबाद येथील श्री गजानन महाराज मंदिरात मुक्कामी पोहोचेल.
मंगळवार, २८ रोजी सकाळी सिल्लोड, दुपारी जामनेर, सायंकाळी कुºहा पानाचे मार्गे सायंकाळी ५ वाजता श्री विठ्ठल मंदिर, भुसावळ येथे पोहोचेल. येथे संत निवृत्तीनाथ व श्री पांडुरंग पादुका भेटीचा सोहळा होईल, तर पंढरपूरहून निघालेल्या संत नामदेव महाराजांच्या पादुका मुक्ताईनगर मुक्कामी पोहोचतील.
बुधवार, २९ रोजी श्री क्षेत्र कोथळी येथे श्री संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळा असून, या सोहळ्यासाठी श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळा पोहोचेल. संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळ्याच्यानिमित्ताने कीर्तनाची सेवा संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. केशवदास नामदास करतील, तर रात्री संत निवृत्तीनाथ संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. जयंत महाराज गोसावी कीर्तन सेवा करतील.
गुरुवार, ३० रोजी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र कोथळी ते श्री क्षेत्र मुक्ताईनगर दिंडी मिरवणूक होईल. त्यानंतर हा सोहळा श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथे मुक्कामी विसावेल.
शुक्रवार, ३१ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ द्वादश पारणे सोहळा होईल आणि त्यानंतर श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरु होईल. मलकापूर, मोताळा , बुलढाणा मार्गे हा सोहळा श्री क्षेत्र चिखली येथील श्री रेणुका माता मंदिरात मुक्कामी पोहोचेल. शनिवार, १ जून रोजी देऊळगावराजा, जालना, अंबड, गेवराई मार्गे बीड मुक्कामी पोहोचेल. बीड येथील श्री हनुमान मंदिरात पालखी सोहळ्याचा मुक्काम आहे.
रविवार, २ जून रोजी कुंतलगीरी फाटा, बार्शी येथील श्री भगवंत मंदिर, कुडुर्वाडी मार्गे सायंकाळी ६ वाजता हा सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचेल.
यावेळी पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, सूर्यकांत भिसे आदी उपस्थित राहणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुसावळ नगराध्यक्षांकडे असलेल्या कर्मचाऱ्यावर पूर्ववैमन्यस्यातून तलवार हल्ला 

Next Post

वरणगाव येथे  महिलेचे मंगळसूत्र धूमस्टाईलने लांबवीले

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us