भडगाव : येथिल नाभिक विकास मंडळाच्यावतीने आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. आषाढी निमित्ताने मंदीरात भजनी मंडळाचा कार्यक्रम घेण्यात आला. मंदीरात भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासुन मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. .
यावेळी तीन तास चाललेल्या कार्यक्रमात सेवानिवृत्त तलाठी उत्तम जाधव यांनी विविध प्रकारची भजन सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली. .
दरम्यान, मंदिरात सरस्वती शिशुविहार विद्यामंदीर शाळेची बालगोपालाची दिंडीचे आगमन मंदीरात झाले असता मंडळाचे अध्यक्ष संजय पवार यांनी दिंडीचे स्वागत केले. दुपारी १२ वाजता समाजाध्यक्ष संजय पवार ,सचिव हिलाल नेरपगारे हस्ते यांच्या आरती करण्यात आली. यावेळी विठ्ठल रुख्मिणी, श्रीसंत सेना महाराज मंदीरात जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिरसाठ, डॉ. पल्लवी पाटील सह नाभिक समाज बांधव, भाविकानी आरतीचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाज तालुकाध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष भरत चव्हाण, सचिव हिलाल नेरपगारे, विजय ठाकरे, शिवाजी शिरसाठ, प्रभाकर नेरपगारे, निलेश महाले, सुभाष ठाकरे, काशिनाथ शिरसाठ, राजु महाले, गोरख वेळीस, सर्व कार्यकारणी सदस्यासह समाज बांधवांनी सहकार्य केले.