विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया
पाचोरा ;- ५ रुपयाणेचे नाणे गिळून श्वसन नलिकेत अडकल्याने एका ११ वर्षाच्या मुलाला श्वासोश्वास घेण्यास अडचण होत असल्याने त्याच्यावर विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये तातडीने शस्त्रक्रिया करून त्याला जीवदान मिळाल्याने त्याच्या पालकांनी डॉक्टरांच्या टीमचे मनपूर्वक आभार मानले.
याबाबत माहिती अशी कि , जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील रोहित शिवाजी राऊत या मुलाने ५ रुपयांचे नाणे खेळता खेळता गिळले होते. तसेच हे नाणे जठरातजाऊन पोहचल्याने त्याचा जीव धोक्यात आला होता. यावेळी त्याच्या आईवडिलांनी रोहितला तातडीने पाचोर्याच्या विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी रोहितवर अपोलो हॉस्पिटलचे गॅस्ट्रोइन्टॉरॉलॉजिस्ट लिव्हर स्पेशलिस्ट डॉ. शरद देशमुख यांनी भूलतज्ज्ञ डॉ. सागर गरुड ,श्री. माने आदींच्या सहकार्याने एन्डोस्कोपी करण्यात येऊन मुलाचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. देवदूतासारखी हि सर्व टीम आमच्यासाठी धावून येत आमच्या मुलाचे प्राण वाचविल्याबद्दल मुलाच्या आईवडिलांनी कृतज्ञता व्यक्त करीत आभार मानले.