नवी मुंबई – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रकल्पग्रस्तांनी आज आपल्या विविध मागण्या पुढे रेटत जोरदार आंदोलन केले व विमानतळाचे काम बंद पाडले.
प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनात हस्तक्षेप करत पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली असून अनेक आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. वाघीवली येथे हे आंदोलन सुरू होते. आंदोलनाचे नेतृत्व करत अखिल भारतीय किसान सभेचे रायगड जिल्हाध्यक्ष रामचंद्र म्हात्रे व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष अनिल पाटील यानाही अटक करण्यात आली आहे.