Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नंदुरबारच्या आदिवासी  प्रकल्पासाठी १४ कोटींचा निधी मंजूर -कुलगुरू 

najarkaid by najarkaid
July 4, 2019
in जळगाव
0
नंदुरबारच्या आदिवासी  प्रकल्पासाठी १४ कोटींचा निधी मंजूर -कुलगुरू 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाध्ला `सिलेज बेसड् एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम (CADP)` या महत्त्वाकांक्षी व विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे नंदुरबार येथील आदिवासी समुदायाच्या क्षेत्रात विकासाला हातभार लावणाज्या प्रकल्पासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, मुंबई यांनी 13 कोटी 95 लाख 91 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खेडी आणि शहर यांच्यातील दरी कमी करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान अधारित प्रक्रिया म्हणजे `सिलेज (City Like Villages)`. तंत्रज्ञानाकरीता भाभा अणुसंशोधन केंद्रासोबत विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे अशी माहिती कुलगुरू प्रा. पी.पी.पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली `सिलेज` आधारित महत्त्वाकांक्षी प्रकल्प तयार करण्यात आला. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष व सुप्रसिध्द अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी या प्रकल्पाबाबत प्रचंड आस्था दाखवून आकार दिला व दीड वर्षापूर्वी विद्यापीठात झालेल्या बौठकीत दिवसभर या प्रकल्पावर झालेल्या चर्चेत सहभाग घेवून काही महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. विद्यापीठाने या प्रकल्पाचा प्रस्ताव राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाकडे सादर केला होता. आयोगाने            या प्रकल्पाला मान्यता देवून जून महिन्यात 13 कोटी 95 लाख 91 हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे.
राज्यशासनाकडून विद्यापीठाला प्राप्त झालेल्या 25 एकर जागेत नंदुरबार येथे विद्यापीठाची आदिवासी अकादमी साकार होत आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी व आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी उपयोगी विज्ञान, समुच्चित तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, कार्यक्षेत्रातील आदिवासी व अन्य समुहांमध्ये परस्पर सहकार्य – सहयोग व समन्वय प्रस्थापित करण्यास सहाय्यभूत होणे अशी काही अकादमीची उद्दीष्ट¶े निश्चित  करण्यात आली आहे. या अकादमी अंतर्गत सिलेज आधारित प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. त्याचे आदिवासी, ग्रामीण आणि शहरी शिक्षण व ज्ञानाचा एकत्रित सायबर मंच Tribal Rural Urban Education Integrated (TRURE ICP) विद्यापीठातील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम भवन येथे स्थापित करण्यात येणार आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई, बायफ पुणे , कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार, एमकेसीएल नॉलेज फाऊंडेशन या संस्था देखील विद्यापीठाच्या या सिलेज आधारित प्रकल्पास सहकार्य करणार आहेत असे कुलगुरू प्रा.पाटील यांनी सांगितले.
काय आहे `सिलेज` : या पत्रकार परिषदेस उपस्थित असलेले राजीव गांधी तंत्रज्ञान आयोगाचे सल्लागार     डॉ. अजित पाटणकर यांनी  सिलेज विषयी सविस्तर माहिती दिली. शहर आणि खेडे यांच्या सुविधांचे एकत्रिकरण  करणे म्हणजे सिलेज. यामध्ये शिक्षण, तंत्रज्ञान आणि कामाची संधी ही गावातील क्षमता लक्षात घेवून येथील पर्यावरणाला पूरक अशी असणार आहे. ग्रामिण व आदिवासी भागाला टाळून निरोगी विकास होणे शक्य नाही त्यामुळे तेथील गरजा लक्षात घेवून या प्रकल्पांतर्गत काही उपक्रम राबविले जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, अक्राणी, धडगाव आणि अक्कलकुवा या चार तालुक्यांमधील 100 गावांमध्ये टप्प्याटप्प्यात उपक्रम राबविले जाणार असून या मध्ये सौरउर्जा, शुध्द पेयजल, पर्यावरणपुरक घरगुती इंधन    तंत्रज्ञान, जौविक खते, औषधी  वनस्पतींची  उती संवर्धनाद्वारे शेती, पोषक अन्नद्रव्ये तंत्रज्ञान तसेच महिलांसाठी तंत्रज्ञान केंद्र यांचा समावेश असणार आहे. आदिवासी समुहातील नवउद्योजक घडविण्यासाठी `विज्ञान व    तंत्रज्ञानावर आधारीत उद्योजक संसाधन केंद्र Science and Technology Entrepreneurship Resourse (STERN)` नंदुरबार येथे स्थापित केले जाणार आहे. याशिवाय तंत्रज्ञान प्रशिक्षण, कार्यशाळा, जनजागृती अभियान आणि क्षेत्रीय भेटी देखील असणार आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून बहिस्थ शिक्षण व अध्ययन  विभागाच्या वतीने सिलेज फिनीशिंग स्कूल अंतर्गत पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. अशी माहिती डॉ. पाटणकर यांनी दिली.
संशोधनाची नाळ समाजाशी जोडणे आवश्यक असून संशोधनातून तंत्रज्ञान, तंत्रज्ञानातून संपत्ती, आणि संपत्तीतून दारिद्रय निर्मूलन असे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारे या डिजीटल युगात सिलेज आधारित हा नवा प्रयोग अंत्यत उपयोगी असा राहणार आहे. सिलेज आधारित कल्पना शहरात अस्तित्वात येणे शक्य नाही. ही केवळ ग्रामीण भागात शक्य आहे. सिलेज उपक्रमात शिक्षण पध्दतीला नवा आकार देण्याची शक्ती आहे, ज्यातून विद्याथ्र्यांच्या सर्जनशीलतेला अधिक वाव प्राप्त होणार आहे. या उपक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्याथ्र्यांचा देखील मोठा सहभाग घेतला जाणार आहे. ज्यामुळे आदिवासी समुहाच्या प्रश्नांची जाणीव आणि या प्रश्नांची उकल या विद्याथ्र्यांना या प्रकल्पामुळे शिकतांनाच मिळणार आहे. तंत्रज्ञान आधारित शिक्षण आणि ज्ञान आधारित प्रगतीचा मार्ग सिलेज आधारित प्रकल्पामुळे सुकर होणार आहे.
या पत्रकार परिषदेला या प्रकल्पाचे मुख्य समन्वयक प्रा. एस.टी. बेंद्रे,  कार्यक्रम समन्वयक व  आदिवासी अकादमीचे संचालक प्रा. ए.बी. चौधरी, उपसमन्वयक प्रा. एच.एल. तिडके, प्रा.के.एस. विश्वकर्मा, प्रा.जे.पी.बंगे, प्रा.बी.एल.चौधरी, प्रा.एस.टी. इंगळे व प्रा. एस.एन.पाटील उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

व्‍हीटीपी समस्यांबाबत कौशल्य विकास मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

Next Post

प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत कर्जासाठी घरबसल्या करा अर्ज !

Related Posts

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत कर्जासाठी घरबसल्या करा अर्ज  !

प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत कर्जासाठी घरबसल्या करा अर्ज !

ताज्या बातम्या

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us