धरणगाव | धरणगावचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी यांच्यासह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या कारवाईने खळबळ उडाली आहे. शेतजमीनीत फेरफार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणगावचे नायब तहसीलदार जयंत पुंडलीक भट्ट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यांच्यावर गुन्हा दाखल
धरणगावचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी यांच्यासह धरणगाव तालुक्यातील नांदेड येथील तत्कालीन तलाठी रोशनी मोरे, तत्कालीन मंडळ अधिकारी वनराज बुधा पाटीलव नाशिक येथील भरतसिंह देवीदास परदेशी आणि निलेश सुरेश चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा :
अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही! ‘हे’ 5G स्मार्टफोन विकले जाताय स्वस्तात, पहा किमती
बँकेची कामे आजचा पूर्ण करा.. ऑक्टोबर महिन्यात तब्बल 21 दिवस बँका बंद
Video : मळमळ होऊ लागल्याने फलाटावरुन वाकला, तितक्यात लोकल आली अन्.. धुळ्याच्या तरुणाचा दुर्दैवी अंत
पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा, एका वर्षात तुम्हाला बँकेपेक्षा जास्त फायदा मिळेल
महसूल खात्याकडे नांदेड येथील देविदास रामदास रडे यांनी तक्रार दिली होती. यात त्यांच्या शेत जमीनीच्या नोंदीत तत्कालीन नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्यासह इतरांनी त्यांना अधिकार नसतांना फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता.
या तक्रारीवरून महसूल खात्याने चौकशी केल्यानंतर नायब तहसीलदार जयंत पुंडलीक भट्ट यांनी फिर्याद दिल्यानुसार या चार जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यामध्ये नांदेड येथील तत्कालीन तलाठी रोशनी मोरे, तत्कालीन मंडळ अधिकारी वनराज बुधा पाटील, यांच्यासह नाशिक येथील भरतसिंह देवीदास परदेशी आणि निलेश सुरेश चौधरी यांचा समावेश आहे.