मुंबई :
अग्निवीरच्या भरतीसाठी आलेल्या धुळे जिल्ह्यातील एका तरुणाला लोकलची धडक बसली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.ही धक्कादायक घटना कल्याण येथे घडली असून रामेश्वर देवरे असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, संबंधित घटना ही कल्याण रेल्वे स्थानकावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अतिशय अचूकपणे कैद झाली आहे.
धुळे जिल्ह्यातील वडजाई या गावाहून 20 वर्षीय तरुण भारतीय सैन्याच्या अग्निवीरच्या भरतीसाठी कल्याणला आला होता. खरंतर त्याच्यासोबत त्याच्या गावातील आणि इतर आजूबाजूच्या गावातील बरोबरीच्या तरुणांचा ग्रुप होता. ते अग्निवीरच्या भरतीसाठी मुंब्राला जाणार होते. पण त्याआधीच कल्याण रेल्वे स्थानकावर भयानक दुर्घटना घडली.
https://twitter.com/News18lokmat/status/1572910147323973635
या दरम्यान कल्याण रेल्वे स्थानकावर थांबले असताना रामेश्वरला मळमळ होऊ लागलं. तो उलटीसाठी रेल्वे रुळाकडे गेला. तो फलाटावरुन वाकून उलटी करत असतानाच अचानक भरधाव लोकल ट्रेन आली. रामेश्वरच्या डोक्याला या लोकल ट्रेनची जोराची धडक बसली. तो 10 ते 15 फूट दूर फेकला गेला. या दुर्घटनेत रामेश्वरचा जागीच मृत्यू झाला.