लातूर प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीतर्फे धनगर जमात आरक्षण हक्क व सत्ता संपादन संकल्प मेळावा २५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता त्यात व्हीबीए चे सर्वेसर्वा ऍड. बाळासाहेब आंबेडकर, आण्णाराव पाटील, यशपाल भिंगे, नवनाथ पडळकर,सुभाष भिंगे यांनी आपलया विचारांतून धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत चर्चा केली. अण्णाराव पाटलांनी धनगर समाजाला संबोधताना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं आवाहन केलं. जेणेकरून आरक्षणाचा रखडलेला मुद्दा मार्गी लागू शकतो.
भाजपा सरकारने मतांसाठी फक्त आरक्षणाचे आश्वासन दिले प्रत्यक्षात ५ वर्ष उलटून गेले तरी त्याबद्दल पाऊले उचलले नाहीत अशी खंत व्यक्त करून आरक्षण मिळवायचे असेल तर आंबेडकरांना साथ देऊन धनगर समाजाने एकजूट होऊन या विधानसभेला आपली ताकद दाखवून देण्याचे आवाहन धनगर बांधवांना केले.
ऍड. प्रकाश आंबेडकरांनी धनगर बांधवांना संबोधताना कुठलीही मागणी पदरात पाडून घ्यावयाची असेल तर त्यासाठी राजकीय शक्ती असणे गरजेचे असते त्यासाठी वंचितांची सत्ता येणे गरजेचे आहे जेणेकरून वंचितांचे प्रश्न वंचित प्रतिनिधी सत्तेत गेल्याशिवाय सुटणार नाहीत हे सांगून धनगर समाजाला गेल्या ७० वर्षांपासून फक्त मतदार म्हणून वापरण्यात आले, परंतु आपण वापरू का दिलं हा देखील सवाल आंबेडकरांनी केला. वंचित बहुजन आघाडीसाठी धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा हा अतिशय जिव्हाळ्याचा मुद्दा आहे असे देखील आंबेडकरांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. तसेच सर्व धनगर समाजाने एक वेळेस वंचित बहुजन आघाडीला सत्तेत बसवावं, निश्चितच धनगर समाजाचे प्रश्न मार्गी लागतील असे आवाहन आंबेडकरांनी केले.