Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशातील शंभर शहरांचे 3D नकाशे तयार होणार !

najarkaid by najarkaid
February 15, 2022
in राष्ट्रीय
0
वक्फ बोर्डाच्या मालमत्तांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण ; राज्यसभेत माहिती
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी – केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेअंतर्गत, ड्रोनसह जिओस्पेशिअल तंत्रज्ञान 6 लाखांहून अधिक भारतीय गावांचे सर्वेक्षण करेल. त्याच बरोबर 100 भारतीय शहरांसाठी 3D नकाशे तयार केले जातील, जे आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारे ठरेल, असेही ते म्हणाले.

जिओस्पेशिअल डेटा प्रकाशनाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ते म्हणाले की,  जिओस्पेशिअल प्रणाली ड्रोन धोरण आणि खुले अंतराळ क्षेत्र हे भारताच्या भविष्यातील आर्थिक प्रगतीचे वैशिष्ट्य असेल. 5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे स्वप्न साध्य करण्यासाठी राष्ट्रीय महत्वाच्या प्रकल्पांमध्ये या उदयोन्मुख  तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाच्या अनुरूप हे आहे असे ते म्हणाले.

जैव तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. एस. चंद्रशेखर,   जिओस्पेशिअल उद्योग संघटनेचे अध्यक्ष अजेंद्र कुमार, जिओस्पेशिअल वर्ल्डचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार, मॅपमायइंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राकेश वर्मा, जेनेसिसचे अध्यक्ष  व्यवस्थापकीय संचालक साजिद मलिक, आयआयटी कानपूरचे प्रा. भरत लोहानी, गुगल, हेक्सागॉनचे प्रतिनिधी आणि इतर उद्योगांचे सदस्य आणि अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

डॉ जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली की मार्गदर्शक तत्त्वांच्या उदारीकरणातून एका वर्षाच्या कालावधीत खूप सकारात्मक परिणाम मिळाले असून जिओस्पेशिअल  धोरण लवकरच जाहीर केले जाईल. स्वामित्व योजनेंतर्गत 6 लाख गावांचे मॅपिंग करण्यासाठी भारतीय सर्वेक्षणाद्वारे जिओस्पेशिअल कंपन्यांच्या निवडीचे आवाहन आणि डिजिटल ट्विन्स या संकल्पनेवर आधारित 100 शहरांसाठी जेनेसिस इंटरनॅशनलने 3D नकाशा बनवण्याचे हाती घेतलेले काम ऐतिहासिक आणि क्रांतिकारी असून यामुळे आमूलाग्र बदल घडून येईल असे ते म्हणाले.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, जिओस्पेशिअल तंत्रज्ञान हे देशाचे “डिजिटल चलन” आहे जे पायाभूत सुविधा, निर्मिती, आरोग्य, कृषी, शहरी नियोजन, महामार्ग आणि सेवा वितरण यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये धडाडीने वापरले जाऊ शकते. ते म्हणाले, एका उद्योगाच्या अंदाजानुसार 2020 मध्ये भारतीय जिओस्पेशिअल बाजारपेठ  23,345 कोटी रुपये होती ज्यात 10,595 कोटी रुपये निर्यात होती जी 2025 मध्ये 36,300 कोटीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

अंतराळ, अणुऊर्जा, ड्रोन आणि मार्गदर्शक तत्त्वांद्वारे जिओस्पेशिअल डेटाचे उदारीकरण हे धाडसी निर्णय या उद्योगाच्या महत्वपूर्ण कामगिरीचे प्रमुख चालक आहेत असे ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काँग्रेसचे स्थानिक पातळीवरील ‘राजकीय’ निर्णय डॉ. उल्हास पाटील घेणार – नाना पटोले

Next Post

पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ साठी आपले विचार आणि संकल्पना पाठवण्यासाठी ‘हे’ करा

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
मोठी बातमी ; पंतप्रधान केयर्स निधीची घोषणा !

पंतप्रधानांच्या 'मन की बात' साठी आपले विचार आणि संकल्पना पाठवण्यासाठी 'हे' करा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us