Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुचाकी अपघातात विद्यार्थिनीसह तरुण ठार

Editorial Team by Editorial Team
April 8, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
दुचाकी अपघातात विद्यार्थिनीसह तरुण ठार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जिल्ह्यात सध्या अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येतेय. अशातच काल बारावीचा पेपर देण्यासाठी येथे दुचाकीने निघालेल्या विद्यार्थिनीसह तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडलीय. पायल कैलास पवार (वय १९, रा.शिवाजीनगर, जळगाव) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून तेजस सुरेश महेर (वय २०) मृत तरुणाचे नाव आहे.

विशेष म्हणजे, ही विद्यार्थिनी जळगावहून पाचोऱ्याला रेल्वेने निघाली होती. मात्र, ती रेल्वे पाचोऱ्याला न थांबल्याने तिला चाळीसगावला उतरावे लागले. तेथून परीक्षेसाठी दुचाकीने येत असताना ही दुर्दैवी घटना घडली.

पायल पवार हिने जळगावातील आयुष करिअर अकॅडमीत पोलिस भरती प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. तर बारावीच्या परीक्षेसाठी तिने गाळण (ता.पाचोरा) हे केंद्र निवडले होते. गुरुवारी सकाळी पायल मराठीचा पेपर देण्यासाठी जळगावहून पाचोऱ्याला रेल्वेने येण्यासाठी जळगाव रेल्वे स्टेशनवर आली. मात्र, नजरचुकीने ती पाचोऱ्याला न थांबणाऱ्या गाडीत बसली. गाडीने जळगावातून थेट चाळीसगावला थांबा घेतला. त्यामुळे चाळीसगावला उतरल्यावर पायलने भांबावलेल्या स्थितीत आयुष अकॅडमीच्या शिक्षकांना फोनवर संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

त्यामुळे अकॅडमीच्या शिक्षकांनी तत्काळ कन्नड तालुक्यातील पांगरे येथील तेजस सुरेश महेर (वय २०) या विद्यार्थ्याशी संपर्क साधला. तोदेखील अकॅडमीचा विद्यार्थी होता. मात्र, सध्या गावी गेलेला होता. त्याला चाळीसगाव येथून पायलला सोबत घेऊन गाळणला सोडून देण्याची विनंती शिक्षकांनी केली. त्यानुसार तेजस दुचाकीवर (क्र.एम.एच.१४-जी.क्यू.४१४४) पायलला घेऊन चाळीसगाव येथून गाळण येथील परीक्षा केंद्रावर जात होता. वाटेत भडाळी-भामरे रस्त्यावर पिकअप व्हॅनने (क्र.एम.एच.१९-सी.वाय.३४३१) दुचाकीला धडक दिली. या अपघातात तेजस महेर याचा जागीच मृत्यू झाला. तर पायल पवार ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. ग्रामस्थांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने काही वेळाने तिची प्राणज्योत मालवली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

.. म्हणून बापाने मुलाला जिवंत जाळले ; थरकाप उडवणारा प्रकार CCTV मध्ये कैद

Next Post

फोन टॅपिंग प्रकरण : खडसेनंतर आता संजय राऊतांची होणार चौकशी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
संजय राऊतांना ईडीचा मोठा झटका, अलिबागमधील संपत्ती जप्त

फोन टॅपिंग प्रकरण : खडसेनंतर आता संजय राऊतांची होणार चौकशी

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us