मुरादाबाद : उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधील तीर्थंकर महावीर विद्यापीठात MDS करणाऱ्या डॉ. वैशाली चौधरी हिनं तिच्या हॉस्टेल रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांना तिच्या खोलीत एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत जवळपास 200 वेळा ‘आशिष लव्ह वैशाली’ असं लिहिलं होतं. नेमका कोणत्या कारणावरुन वैशालीने आत्महत्या केली याचा पोलीस शोध घेत असून मृत्यूसंदर्भात पोलिसांनी दोन डॉक्टर आशिष जाखर आणि समर्थ जोहरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. आशिष जाखड आणि वैशाली हे एमबीबीएसचं एकत्र शिक्षण घेत होते. या काळात त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. दोघांनी एकमेकांशी लग्न कऱण्याचाही निर्णय घेतला मात्र MBBS पूर्ण झाल्यानंतर डॉ. आशिष दिल्लीला निघून गेला आणि डॉ. वैशाली MDS करू लागली.
दिल्लीला गेल्यानंतर आशिष आपलं वचन विसरला, अशी वैशालीची तक्रार होती. या मुद्द्यावरून ती अनेकदा आशिषला भेटायचा प्रयत्न करत होती, मात्र आशिष ते टाळत असल्याचं सांगितलं जातं. या प्रेमभंगाच्या दुःखातूनच तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येच्या आदल्या रात्री वैशाली हॉस्टेलमध्ये आली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी रूमवर आल्यानंतर गळफास लावून आयुष्य संपवलं. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत, जे काही तथ्य समोर येईल त्याच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.
एका कागदावर 200 वेळा लिहिले ‘आशिष लव वैशाली’
वैशालीच्या खोलीची झडती घेतली असता पोलिसांना रजिस्टरमधून एक कागद सापडला. हा कागद फॉइलने झाकून ठेवण्यात आला होता, ज्यावर ‘ashish love vishali’असे सुमारे 200 वेळा लिहिलेले होते.














