Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टुरिस्ट/लक्झरी टॅक्सी चालकांना बॅज प्रदर्शित करणे आवश्यक

najarkaid by najarkaid
December 19, 2019
in जळगाव
0
टुरिस्ट/लक्झरी टॅक्सी चालकांना बॅज प्रदर्शित करणे आवश्यक
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव – उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात फ्लिट टॅक्सी व वेब टॅक्सी सेवा देणा-या संस्थांच्या बैठकीत लक्झरी टॅक्सी व टुरिस्ट टॅक्सीच्या चालकांना महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 1 (१) मधील तरतुदीनुसार लोकसेवा वाहन चालविण्यासाठी अधिकारपत्र आवश्यक आहे. अशी माहिती श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकान्वये दिली आहे.

तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 4 (१) मधील तरतुदीनुसार लोकसेवा वाहन चालविण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नमुन्यातील अधिकारपत्र असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम ४(५) मधील तरतुदीप्रमाणे वाहन चालकांसाठी देण्यात येणा-या अधिकारपत्राची नोंद अनुज्ञप्तीमध्ये घेण्यात येत असते. याचबरोबर वाहनातील प्रवाशाला वाहन चालकाकडे अधिकारपत्र असल्याची बाब माहिती होण्यासाठी नियम 24 बिल्ल्याची (बॅज ) तरतुद करण्यात आली आहे. सध्या बस चालकासाठी बिल्ल्याची तरतूद असून कॅब चालकांसाठी बिल्ल्याची तरतुद वगळून ओळखपत्राची तरतूद करण्यात आली आहे. मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 2 (२५) प्रमाणे मोटार कॅबच्या व्याख्येत सहापेक्षा कमी प्रवाशांची भाड्याने वाहतूक करणा-या वाहनाचा समावेश होतो. यामध्ये मीटर्ड टॅक्सी/ऑटोरिक्षा, टुरिस्ट व लक्झरी कॅबचा समावेश आहे.

कॅब चालकांना नियम 24 मधील बिल्ल्याच्या तरतूदीतुन वगळण्यात आले असले तरी त्यांना नियम 4 (५) प्रमाणे त्यांच्या अनुज्ञप्तीमध्ये अधिकारपत्राची नोंद करुन घेणे व त्यासाठी नियम ४ व नियम 24 मधील तरतुदींची (उदा.वैद्यकीय दाखला, एस.ई.सी. प्रमाणपत्र, चारित्र्य प्रमाणपत्र, स्थानिक भौगोलिक परिस्थितीचे ज्ञान व स्थानिक भाषेचे ज्ञान) पूर्तता करणे आवश्यक आहे.

मोटार कॅबचा चालक व प्रवासी बसचा चालक यांना लोकसेवा वाहन चालविण्याचे अधिकारपत्र व मोटार कॅबचा चालक सोडून अन्य लोकसेवा वाहनाच्या चालकाने (बस) त्याला दिलेला धातूचा बिल्ला व मोटार कॅबच्या चालकाने महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 21 (१८) अन्वये विहीत केलेले ओळखपत्र छातीवर लावणे नियमानुसार आवश्यक आहे. मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 88 (९) अन्वये देण्यात आलेल्या पर्यटक परवान्यावरील वाहन चालविण्या-या चालकांची पात्रता कलम 88 (११) मधील तरतुदीनुसार केंद्र शासनाच्या दि. 8 जून, 1989 च्या अधिसूचनेनुसार नमुद करण्यात आली आहे. तथापि, या तरतुदीमुळे महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधील लोकसेवा वाहन चालविण्याच्या अधिकारपत्राबाबतच्या तरतूदी गैरलागू होत नाहीत.

महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 24 (२) मध्ये लक्झरी कॅब व टुरिस्ट कॅब चालक अनुक्रमे LCD  व TCD  नमुन्यातील बॅज प्रदशित करतील असा उल्लेख आहे. परतु त्याचा नमुना ठरविण्यात आलेला नाही. लक्झरी व टुरिस्ट कॅब चालकासाठी अधिकारपत्र प्राप्त करणे व त्याची नोंद अनुज्ञप्तीमध्ये करणे आवश्यक आहे. याबाबत अनुज्ञप्ती धारक (बॅज ) यांनी नोंद घ्यावी. असे आवाहन श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अत्याचार पिडितांना न्याय मिळण्यासाठी गुन्ह्यांचा तपास तातडीने होणे आवश्यक –  डॉ. नंदकुमार बेडसे

Next Post

सिंचन घोटाळा: अजित पवारांना एसीबीची क्लिन चीट

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us