Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यात विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस

najarkaid by najarkaid
September 19, 2019
in जळगाव
0
जिल्ह्यात विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव- जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून बुधवारी पाचोरासह परिसरात झालेल्या जोरदार पावसानंतर गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आणि दुपारी चार वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस झाला . जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी  मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली .
जिल्ह्यात यंदा पावसाने दमदार व सलग हजेरी लावल्याने जिल्ह्याची पावसाची सरासरी १०५.७ टक्क्यांवर पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील ३ मोठे, १३ मध्यम व ९६ लघुप्रकल्प मिळून एकूण जलसाठा ७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र तरीही भोकरबारी, मन्याड या मध्यम प्रकल्पांमध्ये अद्यापही शून्य टक्के तर अग्नावती धरणात १.६३ टक्केच उपयुक्त साठा झाला आहे.
जिल्ह्यात यंदा पावसाने तब्बल २३ दिवस उशीराने हजेरी लावली. मात्र त्यानंतर दोन-चार दिवसांचाच खंड वगळता पावसाने सातत्यपूर्ण व जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्याने पावसाची शंभरी पार केली असून आतापर्यंत १०५.७ टक्के पाऊस झाला आहे.
जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी ११ तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी १०० च्या पुढे गेली आहे. तर उर्वरीत ४ तालुक्यांपैकी चाळीसगाव वगळता अन्य तीन तालुक्यांची सरासरीही ९५ टक्क्यांच्या पुढेच असून परतीच्या पावसात या तालुक्यांमध्येही पाऊस शंभरी गाठण्याची शक्यता आहे. त्यात जळगाव ९५.५ टक्के, धरणगाव ९५.४, तर भडगाव ९५.६ टक्के यांचा समावेश आहे.
सर्वात कमी चाळीसगावात तर सर्वाधिक रावेर तालुक्यात पाऊस
चाळीसगाव तालुक्यात जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे ८२.६ टक्के पाऊस झाला आहे. तर सर्वाधिक १२८.९ म्हणजेच १२९ टक्के पाऊस रावेर तालुक्यात झाला आहे. जामनेर तालुक्यात १०७.४ टक्के, एरंडोल ११५.४, भुसावळ ११३.४, यावल ११८.१, मुक्ताईनगर १०६.५, बोदवड १०८.७, पाचोरा १०२.८, अमळनेर १०४.४, पारोळा १०४ तर चोपडा तालुक्यात १०६.५ टक्के पाऊस झाला आहे.
धरणांमध्ये एकूण ७९ टक्के पाणीसाठा
जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये मिळून एकूण ७८.९२ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी हाच साठा जेमतेम ५२.३७ टक्के होता.
मोठ्या प्रकल्पांसोबत मध्यम प्रकल्पही समाधानकारक पाणीसाठा
जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ८६.०३ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत केवळ ६०.२४ टक्के पाणीसाठा झाला होता. यंदा हतनूरमध्ये ६१.१८ टक्के, गिरणात १०० टक्के तर वाघूर धरणात ८२.१० टक्के पाणीसाठा झाला आहे. अद्यापही या धरणांमध्ये पाण्याची आवक सुरूच असल्याने उर्वरीत दोन्ही मोठ्या प्रकल्पांमध्येही १०० टक्के पाणीसाठा होण्याची अपेक्षा आहे.
दोन मध्यम प्रकल्पांत शून्य टक्के पाणीसाठाजिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावलेली असतानाही भोकरबारी व मन्याड धरणात शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा असून अग्नावती धरणात १.६३ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काँग्रेसमुळे देशात जातीयवादी शक्तींची ताकद वाढतेय- मायावती

Next Post

महिलांसाठी आयोगाचे डिजिटल साक्षरता अभियान

Related Posts

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
महिलांसाठी आयोगाचे डिजिटल साक्षरता अभियान

महिलांसाठी आयोगाचे डिजिटल साक्षरता अभियान

ताज्या बातम्या

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us