Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या घटली तर आज दिवसभरात १९ जणांचा मृत्यू

najarkaid by najarkaid
May 4, 2021
in राज्य
0
बाहेर फिरत असलेलया गृह विलगीकरणातील रुग्णांवर होणार कारवाई
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- जिल्ह्यात आज दिवसभरात ८०८ बाधित रूग्ण आढळले आहे. तर १०७६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तसेच आज १९ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. आज कोरोना बाधितांची संख्या आणि मृत्यू संख्या देखील घटली असून जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे.

आज आढळून आलेले रुग्ण…

जळगाव शहर- १५३ , जळगाव ग्रामीण- ३१ , भुसावळ- ११३ , अमळनेर-२७, चोपडा-२९, पाचोरा-१६, भडगाव-१७ , धरणगाव-०९, यावल-२५ , एरंडोल- १९ , जामनेर-३८ , रावेर-७८ , पारोळा-३२ , चाळीसगाव- ६९ , मुक्ताईनगर-७८ , बोदवड-४६ आणि इतर जिल्हे ८ असे एकुण ८०८ बाधित रूग्ण आढळले आहे.

राज्यात १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट

राज्यातील सुमारे १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून अन्य काही जिल्ह्यांमध्ये त्यात वाढही होत आहे. लसीकरणाला वेग देण्यासाठी लसींचा पुरवठा आवश्यक असून आज राज्यात कोविशिल्डचे ९ लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्याद्वारे ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जाईल. तर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी सुमारे १८ लाख डोसेससाठी खरेदी आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.मंत्रालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते.

आरोग्यमंत्री श्री टोपे यांनी साधलेल्या संवादातील प्रमुख मुद्दे असे:
• राज्यात ४५ वर्षांवरील सुमारे १ कोटी ६५ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कालपर्यंत राज्यात या वयोगटाच्या लसीकरणासाठी केवळ २५ हजार डोस शिल्लक होते. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद होते.
• आज राज्याला ९ लाख डोस मिळाले आहेत. त्यातून ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाईल. ४५ वर्षांवरील सुमारे ३.५ कोटी लोकसंख्येपैकी ४५ टक्के नागरिकांना लसीकरण झाले आहे.

• दि. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणास सुरूवात झाली. आतापर्यंत या वयोगटातील सुमारे १ लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यांच्या लसीकरणाला गती येण्यासाठी कोविशिल्ड लसीचे १३ लाख ५८ हजार तर कोवॅक्सिन लसीच्या ४ लाख ८९ हजार असे एकूण १८ लाखांहून अधिक डोसेस खरेदी करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.
• स्पुटनिक लस भारतात आली असून तिच्या दराबाबत चर्चा सुरू असून ते निश्चित झाल्यानंतर त्याचे डोस राज्यात मागविले जातील.
• तरुणाईने लसीकरणासाठी गर्दी करू नये.पोर्टलवर नोंदणी आणि दिनांक, वेळ निश्चिती नंतरच लस दिली जाईल. त्यामुळे संयम आणि शिस्त पाळण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.

• राज्य शासनाने रेमडेसीवीर, ऑक्सिजन यासाठी काढलेल्या जागतिक निविदेला कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला आहे. मदत व पुर्नवसन विभागाकडून त्याची छाननी आणि पुढील कार्यवाही सुरू आहे. या जागतिक निविदेच्या माध्यमातून राज्याला साडेतीन लाख रेमडेसीवीर, २० हजार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, २७ स्टोरेज टॅंक उपलब्ध होतील. जेणे करून ऑक्सिजनचा बफर साठा करून ठेवता येईल.

• राज्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत १५० ऑक्सिजन प्लांट (हवेतून ऑक्सिजन शोषून घेणारे) खरेदीसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यांमध्य ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पासाठी जिल्हा विकास व नियोजन आणि राज्य आपत्ती पुर्नवसन निधी यामधून निधी घेण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.

• केंद्र शासनाकडून राज्याला जे १० पीएसए प्लांट मंजीर आहेत त्यातील ९ प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे.
• सध्या केंद्र शासनाकडून राज्याला दररोज ४० हजाराच्या आसपास रेमडीसीवीर मिळत आहे. वाढत्या मागणीमुळे ते कमी पडत आहेत. पुरवठा झालेले रेमडेसीवीर जिल्ह्यांच्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात जिल्हाधिकाऱ्यांना वाटप केले जात आहेत.

• राज्यातील नांदेड, धुळे, मुंबई, भंडारा, ठाणे, नाशिक, लातूर, नंदूरबार, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, रायगड, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गोंदीया या जिल्ह्यांमधील दैनंदिन नवीन रुग्णसंख्या कमी झाली आहे. महाराष्ट्राचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशाच्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
000000

Spread the love
Tags: .#Jalgaoncity#corona news
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा नगराध्यक्षपदी संजय गोहिलच ; विरोधकांची याचिका फेटाळली

Next Post

पाचोरा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाचा मृत्युची अफवा…

Related Posts

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Next Post
पाचोरा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाचा मृत्युची अफवा…

पाचोरा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाचा मृत्युची अफवा...

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us