Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात येणाऱ्या कामांमध्ये लोकोपयोगी कामांचा समावेश करावा –  जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

najarkaid by najarkaid
May 29, 2019
in जळगाव
0
जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात येणाऱ्या कामांमध्ये  लोकोपयोगी कामांचा समावेश करावा  –  जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 29 – जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सन 2019-20 मध्ये विविध कार्यान्वियीन यंत्रणामार्फत हाती घेण्यात येणाऱ्या कामांमध्ये लोकोपयोगी योजना व उपक्रमांचा प्राधान्याने समावेश करावा. तसेच करण्यात येणाऱ्या कामांच्या याद्या जिल्हा नियोजन कार्यालयास तातडीने सादर कराव्यात. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिलेत.

जिल्हा वार्षिक योजनेबाबतचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जळगाव विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांचेसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेतुन ज्या यंत्रणांना निधी प्राप्त होतो. त्यांनी या निधीतून कामांचे नियोजन करतांना लोकोपयोगी योजनांचा जास्तीत जास्त समावेश करुन जनतेच्या हिताची कामे होईल यावर भर द्यावा. तसेच आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेता आचारसंहिता लागण्यापूर्वी नवीन कामांना जून अखेरपर्यंत प्रशासकीय मान्यता घेऊन काम पूर्ण करावे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या ज्या विभागांकडे सन 2015-16 पासून अखर्चित निधी आहे. त्याची माहिती संबंधितांनी तातडीने सादर करावी. अन्यथा त्यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल. असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिला.

जिल्हा वार्षिक योजनेतून (सर्वसाधारण) सन 2019-20 अंतर्गत 308 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतुद मंजूर असून 102 कोटी रुपये इतका निधी अर्थसंकल्पीय प्रणालीवर प्राप्त झाला आहे. ज्या विभागांच्या कामांच्या याद्या प्राप्त होतील. त्यांना प्राधान्याने निधीचे वाटप करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सन 2018-19 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून (सर्वसाधारण) जिल्हा परिषदेकडील योजनांसाठी अर्थसंकल्पीय प्रणालीवर शिल्लक असलेला निधी आहरीत करुन ठेवण्यात आला आहे. त्या योजनानिहाय व कामनिहाय याद्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने जिल्हा नियोजन समितीस सादर कराव्यात व त्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता घेऊन कामांवर निधी खर्च करावा. त्याचबरोबर वितरीत करण्यात आलेला निधी कोणत्या कामांवर खर्च करण्यात आला याची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देशही डॉ. ढाकणे यांनी बैठकीत दिले.

नाविन्यपूर्ण उपक्रम/योजना सुचवा

जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम/योजना राबविण्यासाठी निधी राखीव असतो. या निधीमधून जिल्ह्यात वैशिष्टपूर्ण कामे व्हावीत. यासाठी सर्व संबंधित विभागांनी जिल्ह्याच्या विकासात भर घालण्याबरोबरच जिल्ह्यात वैशिष्टपूर्ण ठरतील अशी कामे  सुचवावी. जे विभाग असे नाविण्यपूर्ण उपक्रम/ योजना सुचवतील अशा विभागांना प्राधान्याने निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. असे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी बैठकीत सांगितले

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी दिला खासदारकीचा राजीनामा !

Next Post

ग्रामसस्तरावरील अधिकारी गावात उपस्थित न राहिल्यास होणार कारवाई !

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post

ग्रामसस्तरावरील अधिकारी गावात उपस्थित न राहिल्यास होणार कारवाई !

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us