दुय्यम निबंधक अधिकारी यांच्याकडे तक्रार दखल
जळगांव – जामनेर येथील खरेदी विक्री दस्त नोंदणी कार्यालयात मुद्रांक विक्रेते थेट उपस्थित राहून खरेदी विक्रीचे दस्त नोंदविण्याचे काम करत असल्याचे सबळ पुराव्यानिशी पत्रकार बाळू वाघ यांनी दुय्यम निबंधक श्रेणी-1 यांच्याकडे आज दिनांक 11जुलै रोजी दिली असून या तक्रारीने मुद्रांक विक्रेत्यांमध्ये चांगलीच खडबळ उडाली आहे.
दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जामनेर येथील बहुतांश मुद्रांक विक्रेते हे मुद्रांक विक्री करण्यात जास्त रस न दाखवता खरेदी विक्री कार्यालयात दस्त नोंदविण्यासाठी दररोज दैनंदिन कामकाजात हजेरी लावतात. मुद्रांक विक्रेत्यांना फक्त्त मुद्रांक विक्री करण्याचा परवाना शासना कडून देण्यात आलेला आहे.मुद्रांक विक्री करताना देखील हे विक्रेते जादा पैसे घेऊन मुद्रांक सामान्य जनतेला विक्री करतात. यामुळे सामान्य जनतेची मोठी आर्थिक लुबाडणूक होत आहे. तर काही मुद्रांक विक्रेता थेट खरेदी विक्री कार्यालयात बस्तान मांडून दस्त नोंदणीचे धंदे सुरु केले आहे. दस्त नोंदणी च्या नावाखाली सामान्य जनतेकडून शासकीय फी पेक्षा कितीतरी पटीने पैसे उकडले जात असल्याचे समोर आले आहे.तसेच दुय्यम निबंधक कार्यालय, जामनेर येथे दररोज जे मुद्रांक विक्रेते बेकायदेशीर पणे हस्तक्षेप करीत खरेदी विक्री चे दस्त नोंदवितात त्या सर्व मुद्रांक विक्रेत्यांवर कारवाई होऊन त्यांचे मुद्रांक विक्रीचे परवाने रद्द करावे अशी तक्रार पत्रकार बाळू वाघ यांनी केली आहे.जामनेर येथील काही मुद्रांक विक्रेत्यांचे मुद्रांक विक्रीचे दप्तर देखील पूर्ण नसल्याची माहिती सूत्रांकडून समजली असून त्या दप्तरांची देखील चौकशी व्हावी तसेच शासनाने मुद्रांक विक्रेत्यांना फक्त मुद्रांक विक्रीचा परवाना दिला असताना खरेदीविक्रीचे दस्त नोंदणीचा बेकायदेशीर पणे सुरु असलेला हा धंदा बंद करावा अशी मागणी होत आहे.